रखरखत्या उन्हात तुमचा जुना कुलर देतोय गरम हवा? ‘या’ तीन टिप्सचा वापर केल्यावर मिळेल एसीसारखी कुलिंग

रखरखत्या उन्हात तुमचा जुना कुलर देतोय गरम हवा? ‘या’ तीन टिप्सचा वापर केल्यावर मिळेल एसीसारखी कुलिंग

आज आपण अशा तीन युक्त्या जाणून घेणार आहोत, ज्यामुळे तुमच्या जुन्या कुलरमधून तुम्हाला एसीसारखी थंड हवा मिळेल.

भारतात उन्हाळा शिगेला पोहोचला आहे. तापमानाने ४५ अंशांचा टप्पा ओलांडला असून उष्ण हवेमुळे नागरिक त्रस्त आहेत. हे टाळण्यासाठी केवळ एसी-कूलरच मदत करत आहेत. काही लोक नवीन एसी विकत घेत आहेत, तर काहीजण जुन्या कुलरवरच काम चालवत आहेत. तुमच्याकडेही जुना कूलर असेल आणि तो थंड हवा देत नसेल, तर आज आपण अशा तीन युक्त्या जाणून घेणार आहोत, ज्यामुळे तुमच्या जुन्या कुलरमधून तुम्हाला एसीसारखी थंड हवा मिळेल. या तीन टिप्स तुमचे काम सोपे करतील आणि तुम्हाला नवीन कूलर घेण्याचीही गरज भासणार नाही.

वायुवीजन (व्हेंटिलेशन) असणे आवश्यक

जर तुम्ही कूलर अशा ठिकाणी ठेवला असेल, जेथे व्हेंटिलेशन नसेल, तर कूलर थंड नाही तर दमट हवा निर्माण करेल. कूलरला पुरेसे व्हेंटिलेशन आवश्यक आहे. खोलीतून हवा बाहेर पडल्यावरच कूलर थंड होईल.

Photos : AC, Cooler चालवल्यावरही वीजेचे बिल येणार कमी; फॉलो करा ‘या’ खास टिप्स

थेट सूर्यप्रकाशात कूलर ठेवू नका

लोक अनेकदा ही चूक करतात. जिथे जास्त सूर्यप्रकाश असतो, तिथे लोक कूलर ठेवल्याने थंड हवा मिळत नाही. म्हणूनच कूलर अशा ठिकाणी ठेवा जेथे थेट सूर्यप्रकाश नसेल. घरात सर्वत्र सूर्यप्रकाश येत असेल तर थेट सूर्यप्रकाश कुलरवर पडणार नाही, अशी व्यवस्था करा.

मोकळ्या जागेत कूलर ठेवा

कूलर नवीन असो वा जुना, तो नेहमी मोकळ्या जागी ठेवा. सोप्या शब्दात, कूलर खुल्या भागात थंड हवा देईल. त्यामुळे खिडकीवर कुलर लावा किंवा जाळीच्या दरवाजाजवळ ठेवा.

Go to Source

Show More

Related Articles

Back to top button
DMCA.com Protection Status