बातम्या

बातमी पाण्याची : या दिवशी येणार पाणी !

बातमी पाण्याची : या दिवशी येणार पाणी !

जळगाव मिरर । २५ जानेवारी २०२३ ।

गेल्या दोन दिवसापासून शहरातील प्रत्येक महिलांना पाण्याची काळजी लागून आहे. त्यासाठी हि बातमी फार महत्वाची आहे. जळगाव शहराला पाणीपुरवठा केल्या जाणार्‍या वाघुर जलवाहिनी व अमृत योजनेअंतर्गत नवीन टाकण्यात आलेल्या मुख्य जलवाहिनी जोडणीचे काम 72 तासानंतर महापालिकेच्या पाणी पुरवठा विभगातर्फे पूर्ण करण्यात आल आहे. त्यामुळे उद्यापासून जळगाव शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे.

मेहरुण येथील औरंगाबाद रोडवरील कस्तुरी हॉटेल जवळील चौकात 1200 मी.मी.ची पाईप लाईन जोडणीचे काम महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने 22 जानेवारी रोजी हाती घेतले होते. 48 तासांचा अवधी या कामासाठी लागणार होता. परंतू, जलवाहिनी जोडणी केल्यानंतर जलवाहिनीची चाचणी घेतांना काही ठिकाणी गळती आढळून आली. त्यामुळे त्या दुरुस्त्या करण्यासाठी एक दिवस पाणी पुरवठा लांबला होता.

22 रोजी होणारा पाणीपुरवठा हा 25 रोजी, 23 व 24 रोजी होणारा पाणीपुरवठा 26 व 27 रोजी त्या-त्या परिसरात नियोजीत वेळापत्रकानुसार होणार आहे. पाणीपुरवठा सुरळीत झाल्याने गृहिणांमध्ये समाधानाचे वातावरण होते.

The post बातमी पाण्याची : या दिवशी येणार पाणी ! first appeared on Jalgaon Mirror News.

Go to Source

Show More

Related Articles

Back to top button
DMCA.com Protection Status