निर्मिती क्षेत्राचा जोम कायम

निर्मिती क्षेत्राचा जोम कायम

देशाच्या निर्मिती क्षेत्राने मरगळ झटकून सरलेल्या मे महिन्यात लक्षणीय सक्रियता दाखविल्याचे बुधवारी प्रसिद्ध झालेल्या मासिक सर्वेक्षणाच्या निष्कर्षांतून पुढे आले आहे.

पीटीआय, नवी दिल्ली : देशाच्या निर्मिती क्षेत्राने मरगळ झटकून सरलेल्या मे महिन्यात लक्षणीय सक्रियता दाखविल्याचे बुधवारी प्रसिद्ध झालेल्या मासिक सर्वेक्षणाच्या निष्कर्षांतून पुढे आले आहे. उत्पादकांनी एकंदर कार्यसंचालनाच्या स्थितीत सशक्त सुधारणा दर्शविल्याने मे महिन्यात निर्मिती क्षेत्राने जोमदार कामगिरी केली आहे.

देशातील निर्मिती क्षेत्राचा प्रवास नोंदविणाऱ्या एस अ‍ॅण्ड पी पी ग्लोबल इंडियाच्या निर्मिती क्षेत्रातील खरेदी व्यवस्थापकांचा कल जोखणाऱ्या (पीएमआय) सर्वेक्षणावर आधारित निर्देशांक मे महिन्यात ५४.६ गुणांवर पोहोचला आहे. आधीच्या एप्रिल महिन्याच्या तुलनेत त्यात नगण्य घसरण झाली आहे. एप्रिलमध्ये तो ५४.७ गुणांवर होता. पीएमआय निर्देशांक ५० गुणांच्या वर राहिल्यास अर्थ व्यवहारातील विस्तार दर्शविला जातो.

मे महिन्यात भारतातील निर्मिती क्षेत्राच्या आंतरराष्ट्रीय पातळीवर विक्रीत अर्थात निर्यातीतही ११ वर्षांतील सर्वात वेगवान वाढ झाली आहे. शिवाय निर्मित उत्पादनांना असलेली मागणी यंदा मोठय़ा प्रमाणात वाढल्याने ती मागणी पूर्ण करण्यासाठी  उत्पादन पूर्ण क्षमतेने व वेगाने वाढविले गेले. याचबरोबर वाढलेल्या मागणीमुळे अतिरिक्त कामगारांची भरती केली गेल्याचे दिसून येते, असे या निमित्ताने एस अ‍ॅण्ड पीच्या अर्थतज्ज्ञ पॉलिआना डी लिमा यांनी स्पष्ट केले.

रोजगारात सर्वोत्तम वाढ

नव्याने आलेला कामांचा ओघ आणि मागणीत सतत वाढ होत असल्याने मे महिन्यांत उत्पादनात वाढ नोंदविण्यात आली. परिणामी मे महिन्यात रोजगारात वाढ नोंदवली गेली, जी जानेवारी २०२० नंतर दिसून आलेली सर्वोत्तम वाढ आहे.

Go to Source

Show More

Related Articles

Back to top button
DMCA.com Protection Status