ज्येष्ठ मराठी अभिनेत्री प्रेमा किरण यांचे हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 61 व्या वर्षी निधन

ज्येष्ठ मराठी अभिनेत्री प्रेमा किरण यांचे हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 61 व्या वर्षी निधन

मराठी चित्रपटसृष्टीतून रविवारी सकाळी एक दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेत्री प्रेमा किरण यांचे मुंबईत निधन झाले.

मराठी चित्रपटसृष्टीतून रविवारी सकाळी एक दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेत्री प्रेमा किरण यांचे मुंबईत निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 61 व्या वर्षी या अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्रीच्या आकस्मिक निधनाने मराठी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. 

 

प्रेमा किरण मराठी अभिनेत्री असण्यासोबतच निर्माती देखील आहे. मराठी चित्रपटसृष्टीशिवाय त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही काम केले आहे. प्रेमा किरण धूम धडका  (1985), मॅडनेस (2001), अर्जुन देवा (2001), कुंकू झाले वैरी (2005) आणि लग्नाची वरात लंडनच्या घरात (2009) यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखल्या जातात. 

 

प्रेमा किरण यांनी 80 आणि 90 च्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका केल्या. दे दणादण , धूमधडका मध्ये त्यांच्या भूमिका गाजल्या. प्रेम किरण आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जोडीला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांची या चित्रपटातील गाणी आजही तितकीच प्रसिद्ध आहेत.

 

अभिनयासोबतच त्यांनी 1989 मध्ये आलेला ‘उतावळा नवरा’ आणि ‘थरकाप’ या चित्रपटांचीही निर्मिती केली. प्रेमा किरण यांनी केवळ मराठीच नाही तर गुजराती, भोजपुरी, अवधी आणि बंजारा भाषांमधील चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या.

Go to Source

Show More

Related Articles

Back to top button
DMCA.com Protection Status