Vat Purnima 2022: उद्या आहे अखंड सौभाग्यासाठी ठेवला जाणारा ‘वटपौर्णिमेचा व्रत’; जाणून घ्या पुजेचा मुहूर्त आणि योग्य विधी 

Vat Purnima 2022: उद्या आहे अखंड सौभाग्यासाठी ठेवला जाणारा ‘वटपौर्णिमेचा व्रत’; जाणून घ्या पुजेचा मुहूर्त आणि योग्य विधी 

दरवर्षी वट पौर्णिमेच्या दिवशी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाची पूजा करतात.

Vat Savitri Vrat 2022 Date, Puja Vidhi, Shubh Muhurat : दरवर्षी वट पौर्णिमेच्या दिवशी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाची पूजा करतात. यावर्षी १४ जून रोजी मंगळवारी वट पौर्णिमेचा उपवास ठेवण्यात येणार आहे. वटवृक्षात त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश राहतात. त्याचबरोबर वटवृक्षाची पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते, त्यामुळे हिंदू धर्मात वटवृक्षाला खूप महत्त्व दिले जाते. उत्तर भारतात याला वट सावित्री व्रत आणि दक्षिण भारतात वट पौर्णिमा व्रत म्हणतात.

वट पौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा केल्याने अखंड सौभाग्यासह जीवनात अपार सुख आणि संपत्ती प्राप्त होते. त्यामुळे या दिवशी वट पौर्णिमेचा व्रत ठेवून विधिनुसार पूजा केल्यास खूप शुभ फळ मिळते. ज्याप्रमाणे वटवृक्षाचे आयुष्य खूप जास्त असते त्याचप्रमाणे पतीचे आयुष्यही खूप मोठे असावे, अशी वडाच्या झाडाची पूजा करण्यामागची धारणा असते. 

सर्वोत्कृष्ट मुलगा आणि जावई सिद्ध होतात ‘या’ राशीची मुलं; सर्वांचे मन जिंकण्यात असतात पटाईत

वट पौर्णिमा १४ जून रोजी साजरी होणार असून ही पौर्णिमा सोमवार, १३ जून रोजी रात्री ९ वाजून २ मिनिटांनी सुरू होईल आणि १४ जूनच्या संध्याकाळी ५ वाजून २१ मिनिटांपर्यंत राहील. या दरम्यान १४ जून रोजी सकाळी ११ ते १२.१५ पर्यंत पूजेचा शुभ मुहूर्त असेल. वट पौर्णिमेच्या दिवशी साध्य योग आणि शुभ योगही तयार होत आहेत.

वटपौर्णिमा व्रत पाळणाऱ्या स्त्रियांनी सकाळी लवकर आंघोळ करून कोणत्याही शुभ रंगाचे कपडे परिधान करावे. सावित्री, सत्यवान आणि यमाची मातीची मूर्ती वटवृक्षाखाली स्थापित करावी. या मुर्त्यांसह वडाची पूजा करावी. यानंतर झाडाभोवती कच्चे सूट गुंडाळून ३ परिक्रमा कराव्या. या दिवशी सत्यवान सावित्रीची कथा अवश्य ऐकावी.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

Go to Source

Related Articles

Back to top button
DMCA.com Protection Status