बातम्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या गडात उद्धव ठाकरे, पाहा कसे झाले स्वागत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या गडात उद्धव ठाकरे, पाहा कसे झाले स्वागत

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) प्रथमच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गडात दाखल झाले. शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह ते गुरुवारी ठाण्यात पोहचले. यावेळी शिवसैनिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.

ठाणे : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) प्रथमच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गडात दाखल झाले. शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह ते गुरुवारी ठाण्यात पोहचले. यावेळी शिवसैनिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. उद्धव ठाकरे येताच त्यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला. हजारो कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी दाखल झाले होते.
ठाण्यात पोहचल्यावर जैन उद्धव ठाकरे यांनी जैन मंदिरात हजेरी लावली. काही दिवसांआधी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी या जैन मंदिराला भेट दिली होती. त्यावेळी जैन धर्मगुरुंशी त्यांनी संवादही साधला होता. यावेळी बाळासाहेबांची भूमिका बजावा, काश्मीरसह पाकिस्तान हवा आहे, असे जैन धर्मगुरु त्यांना म्हणाले होते. जैन मंदिरात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आज प्रजासत्ताक दिन आहे. आपणास हा प्रजासत्ताक टिकवायचा आहे. त्यासाठी फक्त तुमचे एक मत हवे.

आचार्यांनी अखंड भारतसंदर्भात सांगितले होते. त्यावरही उद्धव ठाकरे यांनी मत व्यक्त केले. ते म्हणाले, आचार्यांनी  काही दिवसांपुर्वी अखंड भारताचे स्पप्न मांडले होते. ते आमचेही स्वप्न आहे. या स्पप्नासाठी तुमचे आशीर्वाद हवे आहेत. कारण आशीर्वादाशिवाय काहीच होत नाही. मी फक्त आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. बाळासाहेबांशी तुमचे जसे नाते होते, तसेच नाते आता कायम राहणार असल्याचा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
यावेळी आरोग्य शिबिरात ते गेले. शिबिरात बोलताना ते म्हणाले, मी इथे भाषण करायला आला नाही तर नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आलो आहे. परंतु लवकरच भाषण करायलाही येणार आहे.येत्या काही दिवसांत ठाणे शहरातील नागरिकांच्या राजकीय आरोग्यासाठी मी इथे येणार आहे. शिवसेनाप्रमुखांची शिकवण होती. ती म्हणजे ८० टक्के समाजसेवा आणि २० टक्के राजकारण. ती आपण विसरलेलो नाही. राजन विचारे त्यांचे शिलेदार निष्ठावंत आहेत. बाकी विकाऊ होते. त्यांचा भाव सांगण्याची गरज नाही.

Go to Source

Show More

Related Articles

Back to top button
DMCA.com Protection Status