बातम्या

तुनिशा शर्मा हिच्या मृत्यूनंतर अली बाबा: दास्तान ए काबुल मालिकेमध्ये मोठा ट्विस्ट

तुनिशा शर्मा हिच्या मृत्यूनंतर अली बाबा: दास्तान ए काबुल मालिकेमध्ये मोठा ट्विस्ट

तुनिशा शर्मा हिच्या आईने फक्त शीजान खान हाच नाहीतर त्याच्या कुटुंबियांवर देखील काही गंभीर आरोप करत शीजान खान हाच माझ्या मुलीच्या आत्महत्येला कारणीभूत असल्याचे म्हटले आहे.

मुंबई : तुनिशा शर्मा हिने २४ डिसेंबर रोजी अली बाबा: दास्तान ए काबुल (Ali Baba: Dastan e Kabul) मालिकेच्या सेटवर गळफास घेत आत्महत्या केली. तुनिशा शर्माच्या (Tunisha Sharma) आत्महत्येनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. बालकलाकार म्हणून तुनिशाने आपल्या करिअरची सुरूवात केली होती. फक्त मालिकाच नाहीतर तुनिशा शर्मा हिने काही बाॅलिवूड चित्रपटांमध्ये देखील काम केले. तुनिशा शर्मा हिच्या आत्महत्येनंतर अली बाबा: मालिकेत मुख्य भूमिकेत असलेला शीजान खान याच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले. याचप्रकरणात शीजान खान याला अटकही करण्यात आली. तुनिशा शर्मा हिच्या आईने फक्त शीजान खान हाच नाहीतर त्याच्या कुटुंबियांवर देखील काही गंभीर आरोप करत शीजान खान हाच माझ्या मुलीच्या आत्महत्येला कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. शीजान खान हा तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणात अजूनही न्यायालयीन कोठडीमध्ये आहे.
तुनिशा शर्मा आणि शीजान खान हे दोघेही अली बाबा: दास्तान ए काबुल मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत होते. तुनिशा शर्मा हिने आत्महत्या केल्यानंतर मालिका काही दिवस बंद होईल, असा अंदाज वर्तवला जात होता.
मालिकेच्या निर्मात्यांनी मोठा निर्णय घेत शीजान खान याला मालिकेमधून कायमचा बाहेरचा रस्ता दाखवला. आता मालिकेमध्ये काही महत्वाचे बदल करण्यात आले असून शीजान खान याच्याऐवजी मालिकेमध्ये आता त्याचे पात्र अभिषेक निगम साकारणार आहे.
तुनिशा शर्मा ऐवजी आता कोणती अभिनेत्री हे पात्र साकारण हे मात्र, अद्याप कळू शकले नाहीये. विशेष म्हणजे निर्मात्यांनी आता मालिकेमध्ये नवा ट्विस्ट आणला असून काही महत्वाचे बदल हे करण्यात आले आहेत.
शीजान खान आणि तुनिशा शर्मा हे दोघे रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, तुनिशा शर्मा हिने आत्महत्या करण्याच्या फक्त १५ दिवस अगोदर यांचे ब्रेकअप झाले होते. ब्रेकअपनंतर तुनिशा शर्मा ही तणावामध्ये असल्याचे सांगितले जातंय.
तुनिशा शर्मा हिच्या आईने शीजान खानवर आरोप केल्यानंतर शीजान खान याच्या कुटुंबियांनी देखील तुनिशा शर्मा हिच्या आईवर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणात दररोज मोठे खुलासे होताना दिसत आहेत.

Go to Source

Show More

Related Articles

Back to top button
DMCA.com Protection Status