अक्षया-हार्दिक साखरपुडा

अक्षया-हार्दिक साखरपुडा

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील राणा आणि पाठक बाईंचा लाजत-मुरडत असलेला रोमान्स आपण टिव्हीवर पाहिलाच आहे. यांची ही

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील राणा आणि पाठक बाईंचा लाजत-मुरडत असलेला रोमान्स आपण टिव्हीवर पाहिलाच आहे. यांची ही जोडी प्रेक्षकांना फारच आवडली. राणा दाचं सोज्वळ आणि भोळं असणं तर पाठक बाईंचं शांत आणि समजूतदार असणं असं एक वेगळं कॉम्बिनेशन या सिरीयलमध्ये पहायला मिळालं.

 

या मालिकेने निरोप घेतला असला तरी ही जोडी काही केल्या लोकांच्या डोळ्यासमोरुन जात नव्हती. आणि आता तर या जोडीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. या दोघांनीही आपल्या खऱ्या खुऱ्या आयुष्यातही एकमेकांसोबत रेशिम गाठ बांधली आहे.

 

अक्षया देवधर म्हणजेच पाठक बाई आणि हार्दिक जोशी म्हणजेच राणा दा हे ‘तुझ्यात जीव रंगला’या मालिकेमुळे घराघरांमध्ये पोहोचले. या दोघांनी काल मंगळवारी साखरपुडा केला आहे. या दोघांची ऑन स्क्रीन केमिस्ट्री तर उत्तम होतीच. शिवाय ऑफ स्क्रीन त्यांच्या नातेसंबंधांबाबतही चर्चा सुरु होत्या.

 

ते मालिकेच्या संपण्यानंतरही चर्चेत होते. त्यानंतर आता अचानकच त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर पहायला मिळाल्यामुळे त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्काच बसला आहे. 

Go to Source

Related Articles

Back to top button
DMCA.com Protection Status