
जळगाव मिरर / १८ मार्च २०२३ । जिल्ह्यातून गेल्या काही दिवसापासून अल्पवयीन मुली पळविण्याच्या घटनेत सातत्याने वाढ होत असतांना आढळून येत आहे, याची पोलीस स्थानकात देखील नोंद होत आहे. या घटना अजून देखील बंद झालेल्या नसून आज देखील जिल्ह्यातील विविध गावातून तीन अल्पवयीन मुली पळवून नेल्या प्रकरणी पोलिसात नोंद झालेली आहे. दहावीच्या पेपरला जाण्यासाठी मुलीला […]
The post पालकांनो सावधान : जिल्ह्यातून एकाच दिवशी तीन अल्पवयीन मुलीना पळविले ! first appeared on Jalgaon Mirror News.
पालकांनो सावधान : जिल्ह्यातून एकाच दिवशी तीन अल्पवयीन मुलीना पळविले !
जळगाव मिरर / १८ मार्च २०२३ ।
जिल्ह्यातून गेल्या काही दिवसापासून अल्पवयीन मुली पळविण्याच्या घटनेत सातत्याने वाढ होत असतांना आढळून येत आहे, याची पोलीस स्थानकात देखील नोंद होत आहे. या घटना अजून देखील बंद झालेल्या नसून आज देखील जिल्ह्यातील विविध गावातून तीन अल्पवयीन मुली पळवून नेल्या प्रकरणी पोलिसात नोंद झालेली आहे.
दहावीच्या पेपरला जाण्यासाठी मुलीला रिक्षात बसवल्यानंतर ती बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याघटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलिस स्टेशनला दाखल घटनेतील मुलीचा दहावीचा पेपर होता. त्या पेपरला जाण्यासाठी तिला तिच्या वडीलांनी हॉटेल कस्तुरी तेथून रिक्षात बसवले. त्यानंतर ती बेपत्ता झाल्याचे उघडकीस आले. पोलिस उप निरीक्षक दीपक जगदाळे पुढील तपास करत आहेत.
तर दुसरी घटना भडगाव येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली आहे. अनोळखी इसमाने पळवून नेल्याप्रकरणी भडगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत बाळद रस्त्यावरील एका इलेक्ट्रिक दुकानावरून मुलगी बेपत्ता झाली. सहायक फौजदार छबुलाल नागरे या घटनेचा तपास करत आहेत. तर तिसरी घटना यावल तालुक्यातील किनगाव येथे घडली आहे. किनगावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली आहे. लोकांच्या घरी धुणी भांडी करण्यास जात असल्याचे सांगून गेलेली मुलगी बेपत्ता झाल्याचे उघड झाले. ती ज्यांच्याकडे धुणी भांडी करण्यास जाणार होती त्यांच्याकडे ती मुलगी गेलीच नसल्याचे पालकांनी केलेल्या तपासणीत उघड झाले. याप्रकरणी यावल पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हे.कॉंस्टेबल रविंद्र पाटील करत आहेत.
The post पालकांनो सावधान : जिल्ह्यातून एकाच दिवशी तीन अल्पवयीन मुलीना पळविले ! first appeared on Jalgaon Mirror News.