Samrenu Title Song- ‘समरेणू’ चे प्रेमात पाडणारे शीर्षकगीत प्रदर्शित….

Samrenu Title Song- ‘समरेणू’ चे प्रेमात पाडणारे शीर्षकगीत प्रदर्शित….

लोकप्रिय नेत्या पंकजा मुंढे यांच्या हस्ते ‘समरेणू’ चित्रपटाचे काही दिवसांपूर्वी पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. आता या चित्रपटातील

लोकप्रिय नेत्या पंकजा मुंढे यांच्या हस्ते ‘समरेणू’ चित्रपटाचे काही दिवसांपूर्वी पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. आता या चित्रपटातील शीर्षकगीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या शीर्षकगीतात सम्या आणि रेणूची निखळ प्रेमकहाणी अनुभवायला मिळत आहे. निसर्गाच्या सान्निध्यात प्रेम अधिकच खुलून येते, हे या गाण्यातून दिसून येत आहे. एका निसर्गरम्य गावात या गाण्याचे चित्रिकरण करण्यात आले आहे. 

 

 ‘समरेणू’चे दिग्दर्शक, लेखक महेश डोंगरे म्हणतात, ” हे गाणे सम्या आणि रेणू यांच्यावर चित्रीत करण्यात आले आहे. या गाण्यातून सम्या आणि रेणूचे घनिष्ठ नाते दिसत आहे. मात्र शेवटी हे नाते कोणत्या वळणावर जाते, हे चित्रपटात दिसणार आहे.”

 

‘समरेणू’ हे शीर्षकगीत सुप्रसिद्ध गायक अजय गोगावले यांनी गायले आहे. या प्रेमगीताला गुरू ठाकूर यांनी शब्दबद्ध केले असून सूरज- धीरज यांचे संगीत लाभले आहे. ‘समरेणू’ ची निर्मिती एमआर फिल्म्स वर्ल्डची असून प्रमोद कवडे, बाळासाहेब बोरकर, बालाजी मोरे, युवराज शेलार सहनिर्माता आहेत.

Go to Source

Show More

Related Articles

Back to top button