नऊ दिवसांनी होणारे सूर्य संक्रमण पालटणार ‘या’ राशींचे नशीब; यशाचे नवे मार्ग उघडणार

नऊ दिवसांनी होणारे सूर्य संक्रमण पालटणार ‘या’ राशींचे नशीब; यशाचे नवे मार्ग उघडणार

नऊ दिवसांनंतर म्हणजेच १५ जून रोजी सूर्य आपली राशी बदलून मिथुन राशीत प्रवेश करणार आहे.

ज्योतिष शास्त्रात सूर्य संक्रमण खूप महत्वाचे मानले जाते. सूर्याचा संबंध यश, आदर, पिता, गुरू, शासन-प्रशासन, आरोग्य यांच्याशी आहे, त्यामुळे सूर्याच्या राशी बदलाचा जीवनावर मोठा प्रभाव पडतो. नऊ दिवसांनंतर म्हणजेच १५ जून रोजी सूर्य आपली राशी बदलून मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. बुधाच्या राशीत सूर्याचा प्रवेश काही लोकांसाठी भाग्यवान तर काहींसाठी अशुभ ठरेल. जाणून घेऊया कोणत्या राशीसाठी मिथुन राशीचा सूर्य शुभ फळ देईल.

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांसाठी सूर्य संक्रमण खूप फायदे देईल. त्यांचे अडकलेले पैसे मिळतील. यामुळे आर्थिक स्थिती मोठ्या प्रमाणात मजबूत होईल. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या आर्थिक समस्या दूर होतील. बोलण्याच्या जोरावर कामे होतील. नवीन नोकरीची ऑफर येऊ शकते. नोकरीतील बदल तुमच्या प्रगतीची दारे उघडतील. व्यापाऱ्यांनाही फायदा होईल.

सकाळी उठल्यावर ‘या’ गोष्टी पाहणे असते शुभ; होऊ शकतो धनलाभ

सिंह

सूर्याच्या राशी बदलामुळे सिंह राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल. पैशासाठी नवीन मार्ग मिळतील. अचानक आर्थिक लाभ होईल. व्यावसायिकांचा नफा वाढेल. ज्यांना गुंतवणूक करायची आहे त्यांनी या वेळेचा फायदा घ्या. या वेळी नवीन करार किंवा सौदे होतील, जे फायदेशीर ठरतील.

कन्या

मिथुन राशीत सूर्य देवाचा प्रवेश कन्या राशीच्या लोकांच्या करिअरसाठी शुभ ठरेल. या वेळी नवीन नोकरी मिळू शकते. पदोन्नती-वाढ मिळण्याचीही दाट शक्यता आहे. तुमचे काम चांगले होईल, लोक तुमची प्रशंसा करतील. वरिष्ठ अधिकारी सहकार्य करतील. मान-सन्मान वाढेल.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

Go to Source

Related Articles

Back to top button
DMCA.com Protection Status