बातम्या

सुपरस्टार अभिनेता रजनीकांतने घेतली ‘मातोश्री’ची भेट !

सुपरस्टार अभिनेता रजनीकांतने घेतली ‘मातोश्री’ची भेट !

जळगाव मिरर / १८ मार्च २०२३ ।

राज्यात शिवसेना कुणाची यावरून न्यायालयात वाद सुरु असतांना ठाकरे गटातून अनेक नेत्यासह पदाधिकारी शिंदे गटात येत असल्याने ठाकरे गटाला नेहमी धक्के बसत असतानाच दक्षिणेतील सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांनी आज ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

त्यांच्या या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. दरम्यान, याआधी रजनीकांत मुंबई दौऱ्यावर शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांची भेट घेतली होती. रजनीकांत त्यांच्या ‘रोबोट’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुंबईत होते त्यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी मातोश्रीवर भेट घेतली.

सुपरस्टार थलायवा अभिनेते रजनीकांत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. रजनीकांत यांनी उद्धव ठाकरे यांची ही सदिच्छा भेट होती. ही कुठलीही राजकीय भेट नव्हती, रजनीकांत हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निस्सिम चाहते आहेत. रजनीकांत आणि ठाकरे कुटुंबीयांचे संबंध अतिशय चांगले आहेत. त्यामुळेच रजनीकांत ठाकरे कुटुंबीयांची सदिच्छा भेटीसाठी आले होते, असे सांगण्यात आले. दरम्यान, मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पहिल्या भारत – ऑस्ट्रेलिया वनडे क्रिकेट सामना पाहण्यासाठी रजनीकांत यांना आमंत्रण देण्यात आले होते. त्यानंतर ते खास मुंबईत आले होते. रजनीकांत सध्या कुटुंबासह मुंबईत आहेत. यानिमित्ताने त्यांनी उद्धव ठाकरे यांची ही सदिच्छा भेट घेतली. रजनीकांत यांना एमसीएचे अध्यक्ष अमोल काळे यांनी निमंत्रण दिले होते.

The post सुपरस्टार अभिनेता रजनीकांतने घेतली ‘मातोश्री’ची भेट ! first appeared on Jalgaon Mirror News.

Go to Source

Related Articles

Back to top button
DMCA.com Protection Status