IND vs SA T20 Series : ‘हा’ दक्षिण आफ्रिकन खेळाडू धोनीच्या क्लबमध्ये दाखल होण्यास उत्सुक

IND vs SA T20 Series : ‘हा’ दक्षिण आफ्रिकन खेळाडू धोनीच्या क्लबमध्ये दाखल होण्यास उत्सुक

एम धोनीने ९८ टी ट्वेंटी सामन्यांमध्ये यष्ट्यांच्या मागे ९१ बळी घेतले आहेत. त्यामध्ये ५७ झेल आणि ३४ स्टंपिंगचा समावेश आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा जगातील सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक फलंदाजांमध्ये समावेश होतो. त्याने आतापर्यंत यष्ट्यांचा मागे उभे राहून अनेक फलंदाजांना कसे बाद करायचे याच्या योजना तयार केलेल्या आहेत. इतकेच नाही तर त्या यशस्वीपणे अंमलातदेखील आणल्या आहेत. त्याच्या याच गुणांमुळे निवृत्तीनंतरही त्याला सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक मानले जाते. आता एक दक्षिण आफ्रिकन खेळाडू धोनीच्या या क्लबमध्ये दाखल होण्यास उत्सुक आहे. क्विंटन डी कॉक असे या खेळाडूचे नाव आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेतील दुसरा सामना आज (१२ जून) कटक येथील बाराबती स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात आफ्रिकन संघाचा यष्टिरक्षक क्विंटन डी कॉकच्या नावावर एक मोठ्या विक्रमाची नोंद होण्याची शक्यता आहे. डी कॉकने आज भारताविरुद्ध यष्टीच्या मागे झेल घेतल्यास, तो त्याचा टी ट्वेंटी क्रिकेटमधील ५० झेल ठरेल. असे झाल्यास ही कामगिरी करणारा तो जगातील दुसरा खेळाडू ठरणार आहे. या यादीत भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी पहिल्या क्रमांकावर आहे.

हेही वाचा – ‘…तर मला धोनीच्या डोक्यातील विचार वाचायला आवडतील’, भारतीय फलंदाजाने व्यक्त केली इच्छा

एम धोनीने ९८ टी ट्वेंटी सामन्यांमध्ये यष्ट्यांच्या मागे ९१ बळी घेतले आहेत. त्यामध्ये ५७ झेल आणि ३४ स्टंपिंगचा समावेश आहे. तर, क्विंटन डी कॉकने टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये यष्ट्यांच्यामागे ६४ खेळाडूंना बाद केले आहे. त्यामध्ये ४९ झेल आणि १५ स्टंपिंगचा समावेश आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात डॉ कॉककडे धोनीच्या क्लबमध्ये समाविष्ट होण्याची संधी आहे.

Go to Source

Related Articles

Back to top button
DMCA.com Protection Status