Shani Dev: शनि-बुधाच्या चालीमुळे ४ राशींचे उजळवणार भाग्य, आहेत नवीन नोकरीचे योग

Shani Dev: शनि-बुधाच्या चालीमुळे ४ राशींचे उजळवणार भाग्य, आहेत नवीन नोकरीचे योग

शनी आणि बुधाच्या बदललेल्या हालचालीचा सर्व राशीच्या लोकांवर मोठा प्रभाव पडेल.

Margi Budh Effects: जून महिन्याची सुरुवात दोन मोठ्या बदलांनी झाली. जून २०२२ च्या पहिल्याच आठवड्यात शनी आणि बुध सारख्या २ महत्त्वाच्या ग्रहांची हालचाल बदलली. ३ जून रोजी बुध वृषभ राशीत प्रतिगामी झाला आणि ५ जून रोजी शनि कुंभ राशीत प्रतिगामी झाला. शनी आणि बुधाच्या बदललेल्या हालचालीचा सर्व राशीच्या लोकांवर मोठा प्रभाव पडेल. पुढील १ महिना बुध या स्थितीत राहील आणि शनी ऑक्टोबरपर्यंत मागे जाईल. अशा परिस्थितीत या दोन ग्रहांची बदललेली चाल ४ राशींचे भाग्य उजळवणार आहे.

मेष (Aries)

शनि आणि बुधाच्या बदललेल्या हालचालीमुळे मेष राशीचे दिवस बदलतील. या लोकांना नोकरी-व्यवसायात खूप फायदा होईल. काही लोकांना नवीन नोकरी किंवा बढती मिळू शकते. धनलाभ होईल. नवीन घराची कार खरेदी करू शकता. नवीन गोष्टी सुरू करण्यासाठी उत्तम वेळ आहे.

(हे ही वाचा: 10 June Lucky Zodiac Signs: शुक्रवारच्या ‘या’ आहेत ५ भाग्यशाली राशी; त्यांच्यावर माता लक्ष्मीची असेल विशेष कृपा)

वृषभ (Taurus)

वृषभ राशीमध्ये बुधाचे भ्रमण झाले आहे, जे या राशीच्या लोकांसाठी खूप शुभ आहे. नवीन नोकरीची ऑफर मिळेल. उत्पन्न वाढेल. ज्यांना बढती-वाढीची प्रतीक्षा होती, ती आता संपणार आहे. पुरेसे पैसे हातात आल्यास तुम्हाला आनंद वाटेल. रोखलेले पैसे मिळतील. भागीदारीच्या कामातून लाभ होईल. पैशाची बचत करण्यात यश मिळेल.

(हे ही वाचा: १२ जुलैपासून ‘या’ तीन राशींच्या लोकांवर राहील शनिची कृपादृष्टी; प्रत्येक कामात मिळणार यश)

मिथुन (Gemini)

शनि आणि बुधाच्या चालीतील बदलामुळे मिथुन राशीच्या लोकांसाठी रखडलेली कामे होतील. नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. ट्रीपवर जाऊ शकता. व्यावसायिक चांगले काम करतील. त्यांचा नफाही वाढेल आणि कामाचा प्रसारही होईल.

(हे ही वाचा: Sharp Mind Zodiac Sign: ‘या’ राशीचे लोक असतात अतिशय कुशाग्र, बुद्धीच्या जोरावर प्राप्त करतात उच्च स्थान)

धनु (Sagittarius)

मार्गस्थ बुध आणि प्रतिगामी शनि धनु राशीच्या लोकांना लाभदायक ठरतील. आतापर्यंत रखडलेली प्रमोशन आता मिळू शकते. कामात यश मिळेल. जे लोक सरकारी नोकरीची तयारी करत आहेत, त्यांना यश मिळू शकते. धनलाभ होईल. नवीन मार्गाने पैसे मिळतील.

(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

Go to Source

Related Articles

Back to top button
DMCA.com Protection Status