बातम्या

नाशिकमध्ये ‘पठाण’चे शो हाऊसफुल्ल, चित्रपट पाहण्यासाठी शाहरुखचे चाहते मालेगावमधून नाशिकमध्ये…

नाशिकमध्ये ‘पठाण’चे शो हाऊसफुल्ल, चित्रपट पाहण्यासाठी शाहरुखचे चाहते मालेगावमधून नाशिकमध्ये…

नाशिकच्या चित्रपट गृहांच्या बाहेर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्याकडून कडाडून विरोध केला जात असतांना पोलीसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.

चैतन्य गायकवाड, टीव्ही 9 मराठी, नाशिक : सुरुवातीपासून वादात राहिलेल्या पठाण चित्रपट प्रदर्शित झाला आहे. शाहरुख खान आणि दीपिका पदूकोण यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. पहिल्याच दिवसाचा पहिला चित्रपट हाऊसफुल्ल असल्याचे पाहायला मिळालं आहे. नाशिकच्या चित्रपट गृहांच्या बाहेर बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांनी चित्रपटाला विरोध केलेला असतांना पठाणला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असलेला हा चित्रपट पाहण्यासाठी नाशिकमध्ये मालेगावमधील शाहरुखच्या चाहत्यांनी तिकीट खरेदी केली होती. बॉलीवूडचा किंग म्हणून शाहरुख खानची ओळख आहे. तब्बल चार वर्षांनी शाहरुख खान प्रमुख भूमिका असलेला चित्रपट घेऊन आला आहे. त्याच्या चाहत्यांनी त्याच्या पठाण चित्रपटाला चांगलेच डोक्यावर घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. सोशल मिडियावर देखील पठाण चित्रपटावर चांगल्या वाईट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
पठाण चित्रपटात दीपिका पदूकोण, शाहरुख खान आणि जॉन अब्राहमनेही दमदार कामगिरी केल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे हा बहुप्रतीक्षित चित्रपटाचे पहिल्या दिवसाचा पहिला शो सर्वच ठिकाणी हाऊसफुल्ल असल्याचे पाहायला मिळत आहे.
नाशिकच्या चित्रपट गृहांच्या बाहेर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्याकडून कडाडून विरोध केला जात असतांना पोलीसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.
चित्रपट पाहण्यासाठी मोठी गर्दी असल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी चिटपट गृहांच्या बाहेर पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे.
नाशिकमधील चित्रपट गृहात चित्रपट पाहण्यासाठी मालेगावसह ग्रामीण भागातील अनेक चाहते नाशिक शहरात आले आहे. ऑनलाईन तिकिटे बूकिंग करून हे चाहते पठाण चित्रपट पाहण्यासाठी आलेले होते.
पाहुणा कलाकार म्हणून पठाण चित्रपटात सलमान खान देखील असणार आहे. त्यामुळे शाहरुख आणि सलमान यांच्या चाहत्यांना मोठा आनंद झाला असून पठाण पाहण्यासाठी पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Go to Source

Show More

Related Articles

Back to top button