बातम्या

संजय राऊत यांचे ट्वीट, भाजपाच्या गुंडांनी हा हल्ला केल्याचा आरोप

संजय राऊत यांचे ट्वीट, भाजपाच्या गुंडांनी हा हल्ला केल्याचा आरोप

social media

ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी एक फोटो ट्वीट केला आहे. कारण या फोटोमध्ये  एक तरुणी रक्तबंबाळ अवस्थेत खाली जमिनीवर पडल्याचं दिसत आहे. भाजपाच्या गुंडांनी हा हल्ला केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. तसंच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस  यांना टॅग करत कारवाईची मागणी केली आहे.

 

संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये काय म्हटलं आहे?

संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, सोलापूरच्या बार्शी येथे ही घटना घडडली आहे. भाजपाच्या गुंडांनी 5 मार्चला तिच्यावर हल्ला केला असून ती पारधी समाजाची आहे असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. मुलगी तुमच्या कुटुंबातील नाही म्हणून तिचे रक्त वाया जाऊ देऊ नका असं आवाहन यावेळी त्यांनी फडणवीसांना केलं आहे.

 

“देवेंद्रजी.हे चित्र बार्शीतले आहे. मुलगी तुमच्या कुटुंबातील नाही म्हणून तिचे रक्त वाया जाऊ देऊ नका. भाजपा पुरस्कृत गुंडांनी हा जीवघेणा हल्ला केला आहे. अल्पवयीन मुलगी पारधी समाजाची आहे. गरिबांच्या मुली रस्त्यावर पडल्या आहेत ? 5 मार्चला हल्ला झाला. आरोपी मोकाट आहेत,” असं संजय राऊत ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

Edited by : Ratnadeep Ranshoor

Go to Source

Related Articles

Back to top button
DMCA.com Protection Status