संत निवृत्तीनाथांचे अभंग 111 ते 120

संत निवृत्तीनाथांचे अभंग 111 ते 120

जेथें रूप रेखा नाहीं गुण देखा । चिदाकाश एका आपतत्त्व ॥१॥
तें रूप गोजिरें कृष्ण रूपें सांग । यशोदेचा पांग हरियेला ॥२॥
जेथें रजतम नाहीं तें निःसीम । अपशम दम पूर्णघन ॥३॥
निवृत्ति सार पा ब्रह्मसुख घन । सर्व जनार्दन गोपवेषें ॥४॥

जेथें रूप रेखा नाहीं गुण देखा । चिदाकाश एका आपतत्त्व ॥१॥

तें रूप गोजिरें कृष्ण रूपें सांग । यशोदेचा पांग हरियेला ॥२॥

जेथें रजतम नाहीं तें निःसीम । अपशम दम पूर्णघन ॥३॥

निवृत्ति सार पा ब्रह्मसुख घन । सर्व जनार्दन गोपवेषें ॥४॥

 

गोत वित्त चित्त गोतासी अचुक । चाळक पंचक तत्त्वसार ॥१॥

तें जप सादृश्य कृष्णनाम सोपें । नंदायशोदाखोपें बाळलीला ॥२॥

निरसूनि गुण उगविली खूण । गोकुळी श्रीकृष्ण खेळे कैसा ॥३॥

निवृत्तिचें सार कृष्णनामें पार । सर्व हा आचार हरीहरी ॥४॥

 

विश्वाचा चाळक सूत्रधारी एक । विज्ञान व्यापक ज्ञानगम्य ॥१॥

तें रूप साजिंरे कृष्ण घनः श्याम । योगियां परम रूप ज्याचे ॥२॥

शिव शिवोत्तम नाम आत्माराम । जनवनसम गोपवेषें ॥३॥

निवृत्ति चाळक सर्वत्र व्यापक । आपरूपें एक सर्वत्र असे ॥४॥

 

जाणोंनि नेणते नेणत्या मागते । आपण पुरते नित्यपूर्ण ॥१॥

तें स्वरूप कृष्ण गौळियाच्या भाग्यें । नंदासि सौभाग्य भागा आलें ॥२॥

जाणते पूर्णता पूर्णतां समता । आपण चित्साता गोंपवेष ॥३॥

निवृत्ति परिमाण सर्वपूर्णघन । दिननिशी घन कृष्ण भाग्ययोगें ॥४॥

 

मृगजळाभास लहरी अपार । हा प्रपंच पसारा उदरीं जया ॥१॥

तें रूप वैकुंठ कृष्णरूपें खेळे । गोपाळांचे लळे यमुनातटीं ॥२॥

जाळूनि इंधन उजळल्या दीप्ती । अनंतस्वरूपी एक दिसे ॥३॥

निवृत्ति सागर ज्ञानार्क आगर । कृष्णाचि साचार बिंबलासे ॥४॥

 

गोत वित्त धन मनाचें उन्मन । निमोनि संपूर्ण तयामाजी ॥१॥

जीवन पावन रसाचें निधान । रसरूपें धन रसनेचें ॥२॥

भोग्य भोग भोक्ता आपण तत्त्वता । त्याहुनी परता तयामाजि ॥३॥

निवृत्ति आगर कॄष्ण हा सागर । सर्वरूपें श्रीधर दिसतसे ॥४॥

 

निराकृत्य कृत्य विश्वातें पोखितें । आपण उखितें सर्वाकार ॥१॥

तोचि हा सावळा डोळ डोळस सुंदर । रुक्मिणीभ्रमर कृष्ण माझा ॥२॥

निश्चळ अचळ । नाहीं चळ बळ । दीन काळ फळ हारपती ॥३॥

निवृत्ति सोपान खेचर हारपे । तदाकार लोपे इये ब्रह्मीं ॥४॥

 

मथनीं मथन मधुरता आपण । विश्वीं विश्व पूर्ण सदोदित ॥१॥

तें हे चतुर्भुज मुगुटवर्धन । सुंदर श्रीकृष्ण खेळतसे ॥२॥

दुमदुम पाणि दुमिळित ध्यानीं । दृढता निशाणीं काष्ठीं लागे ॥३॥

ध्रुवाद्य अढळ ब्रह्म हें अचळ । शोखिमायाजाळ निःसंदेहे ॥४॥

क्लेशादि कल्पना क्लेशनिवारणा । आपरूपें भिन्न होऊं नेदी ॥५॥

निवृत्ति कठिण गयनिप्रसाद । सर्वत्र गोविंद नंदाघरीं ॥६॥

 

मन निवटलें ज्ञान सांडवलें । ठाणदिवी केलें ध्यानालागीं ॥१॥

उमटल्या ध्वनि कृष्ण नामठसे । सर्व हृषीकेश भरला दिसे ॥२॥

दिशा दुम ध्यान हारपली सोय । अवघा कृष्ण होय ध्यानींमनीं ॥३॥

निवृत्तिमाजि घर मनाचा सुघडु । कृष्णचि उपवडु दिसतसे ॥४॥

 

अव्यक्त आकार अकारलें रूप । प्रकाश स्वरूप बिंबलेंसें ॥१॥

तें रूप अव्यक्त कृष्णनाम निज । नामाअधोक्षज चतुर्भुज ॥२॥

वर्णासी अव्यक्त वर्णरूप व्यक्त । भोगिती वरिक्त नामपाठें ॥३॥

निवृत्तिचे काज नाम मंत्र बीज । गयनी सहज तुष्टलासे ॥४॥

Go to Source

Show More

Related Articles

Back to top button
DMCA.com Protection Status