तुमच्या जन्म दिवसावरून जाणून घ्या, तुमच्या नशीबाचे तारे कधी चमकणार ?

तुमच्या जन्म दिवसावरून जाणून घ्या, तुमच्या नशीबाचे तारे कधी चमकणार ?

प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संबंधित आहे. त्यामुळे प्रत्येक दिवशी जन्मलेल्या व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व वेगवेगळे असते. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीचा जन्म ज्या दिवशी होतो त्या दिवसावरून त्या व्यक्तीचा स्वभाव आणि भविष्य जाणून घेता येतं.

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्तीची जन्मतारीख आणि कुंडलीत स्थित ग्रह तितकेच महत्त्वाचे असतात. त्याचप्रमाणे आठवड्यातील दिवसांनाही तेच विशेष स्थान आहे. प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संबंधित आहे. त्यामुळे प्रत्येक दिवशी जन्मलेल्या व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व वेगवेगळे असते. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीचा जन्म ज्या दिवशी होतो त्या दिवसावरून त्या व्यक्तीचा स्वभाव आणि भविष्य जाणून घेता येतं. यासोबतच कोणत्या वर्षात व्यक्तीचे नशीब चमकू शकते हे देखील कळू शकते. चला जाणून घेऊया त्या दिवसानुसार तुमचे नशीब कधी चमकेल?

रविवारी जन्मलेले लोक:रविवारचा संबंध सूर्य देवाशी आहे. तसंच या दिवशी जन्मलेले लोक धैर्यवान आणि महत्वाकांक्षी असतात. या लोकांमध्ये आकर्षक व्यक्तिमत्व आणि तीक्ष्ण चेहरा असतो. हे दृढ निश्चयाचे असतात. या लोकांना पैशाची कमतरता नसते. तसंच हे लोक अनेक स्त्रोतांकडून पैसे कमवतात. अशा लोकांचे नशीब वयाच्या २४ व्या वर्षापासून चमकू लागते.

आणखी वाचा : २४ तासांनंतर शनिदेव होणार वक्री, ‘या’ राशींच्या व्यक्तींचे नशीबाचे दरवाजे उघडणार

सोमवारी जन्मलेले लोक:सोमवारचा संबंध चंद्र ग्रहाशी आहे. तसेच या दिवशी जन्मलेले लोक जन्मापासून शांत आणि खूप आनंदी राहतात. हे लोक कवी, लेखक, चित्रपट निर्माते, भाषाशास्त्रज्ञ असू शकतात. त्यांचे मन चंचल असते. ते एका जागी बसत नाहीत. अशा व्यक्ती स्वभावाने शांत आणि आध्यात्मिक असतात.

मंगळवारी जन्मलेले लोक:हा दिवस मंगळ ग्रहाशी संबंधित आहे. त्यामुळे या दिवशी जन्मलेले लोक काळेभोर, कुरळे केस, लांब मान, शूर, शूर आणि खेळाडू, गिर्यारोहक, पोलीस आणि लष्करातील कर्मचारी आणि जिद्दी असतात. मंगळवारी जन्मलेले लोक खूप धाडसी, स्मार्ट आणि सक्रिय असतात. हे लोक धोका पत्करण्यास घाबरत नाहीत. या दिवशी जन्मलेल्या लोकांचे नशीब २८ व्या वर्षी बदलू लागते.

आणखी वाचा : Budh Margi 2022: वृषभ राशीत बुधाचा प्रवेश, या ३ राशींना चांगले दिवस सुरू होतील, प्रत्येक कामात यशाचे योग

बुधवारी जन्मलेले लोक:हा दिवस बुध ग्रहाशी संबंधित आहे. तसेच या दिवशी जन्मलेल्या व्यक्ती बुद्धिमान यशस्वी व्यापारी, बँकर, दलाल, वकील, अनेक भाषांचे ज्ञान असलेले असतात. या दिवशी जन्मलेले लोक त्यांच्या कलेद्वारे इतरांना आकर्षित करतात आणि कलेत जाणकार असतात. या दिवशी जन्मलेल्या लोकांचे नशीब थोडे उशिरा चमकते. वयाच्या ३२ व्या वर्षी या लोकांचे करिअर चमकू लागते.

गुरुवारी जन्मलेले लोक:हा दिवस गुरु ग्रहाशी संबंधित आहे. म्हणूनच या दिवशी जन्मलेले लोक निरोगी, लांब, कुरळे केस असलेले, धारदार नाक असलेले गोरे रंगाचे, आशावादी असतात. तसेच हे लोक साहित्य, संगीत, कला प्रेमी आहेत. असे लोक कष्टाला कधीच घाबरत नाहीत आणि यशस्वी होतात. या दिवशी जन्मलेली व्यक्ती सांसारिक सुखांपासून दूर राहते. तसेच या लोकांचे नशीब वयाच्या १६ व्या वर्षीच चमकू लागते.

आणखी वाचा : Grah Gochar: २ दिवसात दोन महत्त्वाचे ग्रह बदल, या ४ राशींना प्रगतीसह रखडलेला पैसा मिळू शकतो!

शुक्रवारी जन्मलेले लोक:हा दिवस शुक्र ग्रहाशी संबंधित आहे. त्यामुळे या दिवशी जन्मलेल्या व्यक्तींचे व्यक्तिमत्त्व आकर्षक असते. तसंच या लोकांना लक्झरी लाइफ जगण्याची हौस असते. हे लोक शौकीन, विनोदी, ललित कला आणि हस्तकलामध्ये हुशार आहेत आणि चित्रपट, मिठाई, रेशीम, चांदी, हिरे, मोती, कापड यांचे व्यापारी आहेत. या दिवशी जन्मलेले लोक वयाच्या २५ व्या वर्षी चांगले काम करण्यास सुरवात करतात.

शनिवारी जन्मलेले लोक:हा दिवस शनी ग्रहाशी संबंधित आहे. म्हणूनच या दिवशी जन्मलेले लोक मेहनती आणि कर्मठ असतात. असे लोक यश, आनंद आणि महत्त्वाकांक्षेसाठी कठोर संघर्ष करण्यास देखील तयार असतात. जे काम करायचे ते पूर्ण करूनच हे लोक श्वास घेतात. या दिवशी जन्मलेल्या लोकांचे नशीब थोडे उशिरा चमकते, पण संयमाचे फळ गोडच मिळतं असं म्हणतात. त्यामुळे वयाच्या ३६ व्या वर्षी या लोकांचे नशीब बदलू लागते.

Go to Source

Related Articles

Back to top button
DMCA.com Protection Status