बातम्या

कसबा, पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीच्या तारखेत बदल

कसबा, पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीच्या तारखेत बदल

पिंपरी चिंचवडआणि कसबा पेठ विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीच्या तारीखेत बदल करण्यात आला आहे. आता ही निवडणूक २६ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.

पुणे : पिंपरी चिंचवड (Pimpari Chinchwad) आणि कसबा पेठ (Kasba Peth) विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकांची तारीख जाहीर झाली होती.  २७ फेब्रवारी रोजी या दोन्ही जागांवर पोटनिवडणूक (By Poll Election) होणार होती. मात्र त्यात आता बदल करण्यात आला. नवीन तारीख  २६ फेब्रवारी करण्यात आल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.
कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं. तर पिंपरी चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचंही नुकतंच निधन झालं. या दोन्ही आमदारांच्या जागेवर आता पोटनिवडणूक घेतली जाणार आहे. ही निवडणूक २७ फेब्रवारी रोजी होणार होती. परंतु बारावीच्या परीक्षेमुळे ही निवडणूक २६ फेब्रवारी रोजी होणार आहे.
निवडणूक कार्यक्रम कसा?

निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार, 31 जानेवारी 2023 रोजी उमेदावारांची नामांकन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होईल.
06 फेब्रुवारी 2023 पर्यंत ही अर्ज भरण्याची शेवटची मुदत असेल.
 08 फेब्रुवारी 2023 उमेदवारी अर्जांची छाननी होईल.
 10 फेब्रुवारी 2023 रोजी शुक्रवारी अर्ज परत घेण्याची तारीख असेल.
27 फेब्रुवारी 2023 रोजी या जागांसाठीचं मतदान पार पडेल.
02 मार्च रोजी मतमोजणी होईल.

Go to Source

Show More

Related Articles

Back to top button
DMCA.com Protection Status