महत्वाची बातमीमहिला विशेषमाहिती विभागमुद्दा गंभीर आहे !

महिला सुरक्षितता : छेडछाड आणि त्यापलीकडील त्रास : काय केले पाहिजे ? : भारत लाईव्ह न्यूज मीडिया !

महिला सुरक्षितता : छेडछाड आणि त्यापलीकडील त्रास : काय केले पाहिजे ? : भारत लाईव्ह न्यूज मीडिया !
महिला सुरक्षितता : छेडछाड आणि त्यापलीकडील त्रास : काय केले पाहिजे ? : भारत लाईव्ह न्यूज मीडिया !

मुंबई : धनवीरसिंग ठाकूर , सर्व सार्वजनिक स्थळे सर्वांसाठी खुली आहेत. त्यांचा आनंद सर्वजण घेऊ शकतात. मात्र, अनेक स्त्रियांसाठी ही गंभीर छळाची ठिकाणे ठरतात. स्त्रियांच्या संचाराच्या तसेच व्यक्ती म्हणून प्रतिष्ठेच्या मूलभूत हक्कावर दररोज गदा हाणली जात आहे.
परंतु स्त्रिया च स्वतःच्या ह्या समस्येला पूर्णपणे आळा घालू शकतात. गरज आहे ती थोड्याश्या हिम्मतीची आणि मदतीची. हिम्मत मला मदत पाहिजे ची हाक मारण्याची ? आणि तुमच्या हाकेला प्रतिसाद घालणाऱ्या सर्व सामाजिक घटक , पोलीस यंत्रणा ह्यांची योग्य वेळी मदत.
हा समतोल घडून आल्यास सार्वत्रिक रित्या एक मोठी जबाबदारी स्वीकारून आपण आपल्या आजू बाजूला असलेल्या सर्व स्त्रियांना त्या एकट्या नाहीत ची अनुभूती करवून देऊ शकतो.
प्रवास करतांना अनेकदा युवती , तरुणी शाळेत कॉलेजला जात येत असतांना काही असामाजिक तत्व त्यांना विविध इशारे , शिट्टी वाजवून , उद्धट भाषेतून विछिन्न आवाज करून , किव्हा समोर गलिच्छ आणि अश्लील चाळे करून. लज्जित करून त्यांना त्रास देत असतात. आपण अशी एखादी घटना होत असतांना बघतिलेच ? तर तरुणी युवती आपल्याच घरातील सदस्य समजून तिच्या हाक मारून मदत मागण्या अगोदरच तिला मदत करा.

सार्वजनिक स्थळी होणाऱ्या लैंगिक छळाशी निगडित गैरसमज:

– विशिष्ट कपडे घातल्यामुळे लैंगिक छळाला आमंत्रण मिळते

हा गैरसमज आहे. कोणत्याही वयोगटातील व कोणत्याही प्रकारचे कपडे घातलेल्या स्त्रियांचा छळ होऊ शकते हे जगभरातील अनेकविध अभ्यासांतून पुढे आले आहे. एनआयपीपीसीआयडीने दिल्ली पोलिसांसाठी केलेल्या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या स्त्रियांपैकी ८२ टक्के स्त्रिया अगदी सामान्य, प्रक्षोभक नसलेले कपडे (सलवार-कमीज, ट्राउजर-टॉप, साडी) परिधान करत होत्या, तरीही त्यांना लैंगिक छळाचा सामना करावा लागला होता.

– विशिष्ट वर्गातील लोकच लैंगिक छळात सहभागी असतात

हीदेखील सामान्य धारणा आहे. मात्र, येथे मुद्दा वर्गाचा नाही, तर मानसिकतेचा आहे. स्त्रियांना त्रास देणे सोपे आहे असे वाटणारे लोक स्त्रियांचा लैंगिक छळ करण्यात सहभागी असतात.

लैंगिक छळाची समस्या कशी हाताळावी?

लैंगिक छळाची समस्या हाताळण्यासाठी एक असा उपाय नाही. प्रत्यक्ष घटनास्थळी आजूबाजूचे संदर्भ विचारात घेऊन निर्णय घेणे महत्त्वाचे आहे.

स्पष्टपणे व मोठ्या आवाजात ‘नाही’ म्हणायला शिका. एखादे वाक्य मनात योजून ठेवा (उदाहरणार्थ, ‘माझ्याकडे टक लावून बघू नका’) आणि ते प्रतिक्षिप्त क्रियेसारखे उमटत नाही, तोवर ते म्हणण्याचा सराव करा. जर तुम्हाला कोणी त्रास देत असेल तर त्या व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी हे वाक्य सुनावण्याचा आत्मविश्वास येईपर्यंत सराव करत राहा.

आत्मविश्वासाने संवाद साधणे शिका. तुम्हाला त्रास देणाऱ्यांकडे सरळ बघा आणि त्यांच्या वर्तनाला स्पष्टपणे व शांतपणे उत्तर द्या. तुम्हाला तुमच्या हक्कांची व खासगीत्वाच्या अधिकाराची जाणीव आहे हे समोरच्याला दाखवून द्या.

तुम्ही बसमधून प्रवास करत असाल, तर अशा वर्तनाची तक्रार वाहक किंवा चालकाकडे करू शकता. कायद्यानुसार तक्रार करणाऱ्या स्त्रीबरोबर जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन तिला मदत करू शकता.

जवळ सेफ्टीपिन्स बाळगणे तसेच स्वयंसंरक्षणाची तंत्रे अंगिकारणे उपयुक्त ठरू शकते.

महिला सुरक्षितता : छेडछाड आणि त्यापलीकडील त्रास : काय केले पाहिजे ? : भारत लाईव्ह न्यूज मीडिया !
महिला सुरक्षितता : छेडछाड आणि त्यापलीकडील त्रास : काय केले पाहिजे ? : भारत लाईव्ह न्यूज मीडिया !

तुम्हाला कोणी सातत्याने त्रास देत असेल, तर याची माहिती तुमच्या पालकांना/मित्रमंडळींना दिली पाहिजे. यातून या त्रासावर उपायही निघू शकतो आणि तुम्हाला पाठिंबाही मिळू शकतो. अनेक स्त्रिया या त्रासातून गेलेल्या असतात आणि तुम्हाला काय अनुभव येत आहे हे त्या समजून घेऊ शकतात.

आज भरपूर सेल्फ डेफेन्सिंग उपकरणे सहज रित्या बाजारात मिळून येतात युवती तरुणी जे बाहेर कामी ये जा करत असतील. ज्यांना रात्री अपरात्री निघावे लागते त्यांनी आपल्याजवळ असले सेल्फ प्रोटेक्टिन्ग उपकरणे ठेवले पाहिजे. आपल्या जवळच्या नातेवाईक , मदतनीस ह्यांचे संपर्क क्रमांक आपल्या मोबाईल मध्ये स्पीडडायल मध्ये फीड करा. ज्या मुळे संकट समयी लगेच आपण त्यांच्या पर्यंत पोहोचू शकतो.

महिला सुरक्षितता : छेडछाड आणि त्यापलीकडील त्रास : काय केले पाहिजे ? : भारत लाईव्ह न्यूज मीडिया !
महिला सुरक्षितता : छेडछाड आणि त्यापलीकडील त्रास : काय केले पाहिजे ? : भारत लाईव्ह न्यूज मीडिया !

शक्य असल्यास आपण कुठे आलो गेलो पोहोचलो ह्याची माहिती कुणीही एकाला हमखास शेअर करा. लोकेशन उपलब्ध असल्यास ते पाठवा म्हणजे कुठल्याही इमर्जन्सी मध्ये तुमच्या पर्यंत ताबडतोब मदत पोहोचेल.

महिला सुरक्षितता : छेडछाड आणि त्यापलीकडील त्रास : काय केले पाहिजे ? : भारत लाईव्ह न्यूज मीडिया !
महिला सुरक्षितता : छेडछाड आणि त्यापलीकडील त्रास : काय केले पाहिजे ? : भारत लाईव्ह न्यूज मीडिया !

पोलीस संपर्क जवळ ठेवा , महिला वाहिनी , दामिनी पथक , पोलीस एप्प मोबाईल मध्ये ठेवा.
थोडी आपली सुरुवातीची काळजी आपल्याला मोठ्या संकाटातून आधीच बाहेर ठेवू शकते. जमल्यास ईतरांना ह्या माहितीची लिंक शेअर करा. !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
DMCA.com Protection Status