गुन्हेगारीपब्लिक से बोल आज विशेष !बातम्यामहत्वाची बातमीमुद्दा गंभीर आहे !
Trending

पत्रकारांना धमकावून प्रकरण मागे घेण्या साठी दादागिरी आणि सामाजिक मंचाचा गैर वापर ? मलकापूर अवैध देहविक्री प्रकरण : भारत लाईव्ह न्यूज मीडिया !

पत्रकारांना धमकावून प्रकरण मागे घेण्या साठी दादागिरी आणि सामाजिक मंचाचा गैर वापर ? मलकापूर अवैध देहविक्री प्रकरण : भारत लाईव्ह न्यूज मीडिया !
पत्रकारांना धमकावून प्रकरण मागे घेण्या साठी दादागिरी आणि सामाजिक मंचाचा गैर वापर ? मलकापूर अवैध देहविक्री प्रकरण : भारत लाईव्ह न्यूज मीडिया !

 

बुलढाणा : धनवीरसिंग ठाकूर , मलकापूर शहरातील सामाजिक वातावरण गढूळ आणि मालिन करण्यासाठी अवैध रित्या देहविक्रेती एजेंट नामे जांगडे ह्यांना मलकापूर शहर पोलीस स्थानकातील कार्यरत कर्मचारी ह्याचे उघड अभय असून दर महा मोठ्या लाचेच्या सोबत त्याच कर्मचाऱ्या च्या मालकीचे घरात हा अवैध गोरख धंदा करण्याचा उपयोग आता पर्यंत करण्यात आला असल्याची धक्का दायक माहिती समोर येत आहे.

सदर महिलेने स्थानिक पत्रकारांना संपर्क करून प्रकरण मागे घ्या अन्यथा तुमच्यावर खोट्या केसेस दाखल करून सामाजिक मंचाचा गैर वापर करून प्रताडित करण्याची धमकी.

महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री तसेच विद्यमान आमदार ह्यांच्या सामाजिक प्रतिमेचा गैर वापर करीत सदर महिलेकडून आपण त्यांच्या राजकीय पक्षाचे पदाधिकारी असल्याचा आव आणीत सदर अवैध कामगिरी सुरु असल्याची खात्री लायक माहिती मिळाली असता. संबंधित राजकीय पक्षाच्या स्थानिक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना सदर बाबतीची माहिती मागितली असता कळाले सदर महिलेचे अवैध धंदे तसेच असामाजिक कृत्यां मध्ये समावेश असल्यामुळे त्यांची आमच्या पक्ष संघटनेमधून कधीच हकालपट्टी करण्यात आलेली आहे. तसेच जर सदर महिला तसेच इतर साथीदार अजूनही आमच्या सामाजिक संघटना व राजकीय पक्षाची प्रतिमा मालिन करण्यास उपयुक्त काहीही कृती करत असतील तर आम्ही आमच्या पक्षाच्या आणि संघटनेच्या वतीने प्रतिबंधात्मक कार्यवाही होणेसाठी पाऊले उचलणार असा सूचक ईशारा दिला.

मलकापूर शहर पोलीस स्थानक पोलीस निरीक्षक महोदय ह्यांना संबंधित प्रकरणाची माहिती कामी संपर्क केले असता सध्या ते बाहेरगावी असल्याचे समजते. निरीक्षक महोदय आल्यावर शहरातील प्रतिष्टीत पत्रकार तसेच विविध सामाजिक प्रतिनिधी सदर प्रकरणाची प्रतिबंधात्मक कार्यवाही होणेसाठी भेट घेणार असल्याचे वृत्त आहे. तसेच तेथीलच कर्मचारी आपल्या पदाचा तसेच अधिकारांचा गैर वापर करून अवैध धंदे करण्यास मदत करत असल्याचे समजल्यावरून त्या कर्मचारी अधिकाऱ्याची कार्यालयीन चौकशी होऊन सेवेतून हटविण्यात यावे असेही मागणी सामाजिक स्तरावरून उठत आहे. सदर महिलेच्या वतीने ठिकाणं बदलण्याची कामगिरी सुरु असल्याचे परिसर वासियांकडून चर्चा. पुढील होणाऱ्या सर्व कार्यवाही कडे प्रसार माध्यमांचे लक्ष लागून. बयूरो रिपोर्ट भारत लाईव्ह न्यूज मीडिया !

Related Articles

Leave a Reply

Back to top button
DMCA.com Protection Status