BSNLचा दमदार रिचार्ज प्लॅन

BSNLचा दमदार रिचार्ज प्लॅन

रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाने प्लॅनच्या किमती वाढवल्यानंतर ग्राहकांमध्ये नाराजी आहे. खासगी टेलिकॉम कंपन्यांचे प्रीपे

रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाने प्लॅनच्या किमती वाढवल्यानंतर ग्राहकांमध्ये नाराजी आहे. खासगी टेलिकॉम कंपन्यांचे प्रीपेड प्लॅन्स इतके महाग झाले आहेत की, लोक त्यांचे नंबर इतर कंपन्यांकडे पोर्ट करीत आहेत. BSNL ही एकमेव कंपनी आहे. जिने आपल्या प्लॅनमध्ये कोणतेही बदल केलेले नाही.

 जर तुम्ही देखील बीएसएनएलचे सदस्य असाल आणि मोठ्या वैधतेसह स्वस्त प्लॅन शोधत असाल तर आम्ही तुम्हाला कंपनीच्या अशाच एका प्लॅनबद्दल माहिती देणार आहोत. हा प्लॅन कंपनीच्या सर्वात स्वस्त प्लॅनपैकी एक आहे, जो 6 महिन्यांसाठी दररोज 3 जीबी डेटासह येतो. विशेष बाब म्हणजे इतर कंपन्या या किंमतीत निम्मी वैधता आणि डेटा देतात. 

कंपनीने आता ग्राहकांसाठी 666 रुपयांचा धमाकेदार प्लॅन उपलब्ध केला आहे. यामध्ये ग्राहकांना 120 दिवसांची वैधता देण्यात आली आहे. दरम्यान अजून पर्यंत कोणत्याही कंपनीकडून 120 दिवसांची वैधता असलेला प्लॅन ग्राहकांना देण्यात आला नाही आहे. 

Go to Source

Show More

Related Articles

Back to top button