विदर्भात राजकीय वातावरण पेटलं, यवतमाळात राष्ट्रवादीनं जाळला राणेंचा पुतळा, वर्धेत ठाकरेंच्या समर्थनार्थ पोस्टरबाजी

विदर्भात राजकीय वातावरण पेटलं, यवतमाळात राष्ट्रवादीनं जाळला राणेंचा पुतळा, वर्धेत ठाकरेंच्या समर्थनार्थ पोस्टरबाजी

उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ वर्धेच्या ठाकरे मार्केट येथे शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीने रस्त्यावर उतरत उद्धव ठाकरे यांचं समर्थन करत घोषणाबाजी केली. यावेळी कार्यकर्त्यांच्या हातात आम्ही शिवसेनेसोबत असे फलक झलकत होते.

नागपूर : यवतमाळात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या विरोधात धमकीचे उद्गार काढले. याचा विरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले. यवतमाळ बसस्थानक चौकात नारायण राणे यांचा पुतळा जाळला. राष्ट्रवादीचे आशिष मानकर व पंकज मुंदे यांनी कार्यकत्यांसह राणे यांचा पुतळा जाळला. शरद पवार यांनी सरकारबाबत विचार मांडले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वक्तव्य केलं. पण, नैराश्येपोटी त्यांनी वक्तव्य केलं. त्याचा यवतमाळ राष्ट्रवादीतर्फे (NCP) निषेध करत आहोत. असे वैफल्यग्रस्त विधान करणं टाळावं. महाराष्ट्र पेटण्यापासून वाचवावा, असा इशारा यवतमाळच्या (Yavatmal) राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिलाय. आम्ही शरद पवार यांचे मावळे आहोत. आम्ही शरद पवार यांच्या केसालासुद्धा धक्का लागू देणार नाही, असंही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणाले.
ठाकरेंच्या समर्थनार्थ वर्धेत घोषणाबाजी
महाराष्ट्रात सुरू असलेले राजकीय संकटावरून शिवसेनेत दोन गट पडले आहे. एकनाथ शिंदे हे आपल्या समर्थीत आमदारांसोबत गुवाहाटी येथे गेले आहेत. सध्या उद्धव ठाकरे हे एकटे पडल्याचं चित्र आहे. उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ वर्धेच्या ठाकरे मार्केट येथे शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीने रस्त्यावर उतरत उद्धव ठाकरे यांचं समर्थन करत घोषणाबाजी केली. यावेळी कार्यकर्त्यांच्या हातात आम्ही शिवसेनेसोबत असे फलक झलकत होते. आम्ही ठाकरे यांच्या बाजूनं असल्याचं शिवसैनिकांनी सांगितलं. यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
ठाकरेंच्या समर्थनार्थ वर्धेत घोषणाबाजी
नरेंद्र भोंडेकरांविरोधात निदर्शनं
शिवसेनेशी बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांच्यासोबत 41 आमदार गुवाहाटीला गेले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार संकटात सापडले आहे. भंडारा विधानसभेचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर हेसुद्धा एकनाथ शिंदे यांच्या गटात गेलेत. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ भंडारा शहरात शिवसैनिकांनी निदर्शनं केली. बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसैनिकांनी तीव्र निदर्शने केली. यावेळी आम्ही ठाकरेंसोबत असल्याचं शिवसेना जिल्हाप्रमुख संजय रेहपाडे यांनी सांगितलं.

Go to Source

Show More

Related Articles

Back to top button
DMCA.com Protection Status