बातम्या

Pathaan | शाहरुखच्या ‘पठाण’मध्ये ‘भाईजान’ सलमानची धमाकेदार एण्ट्री; थिएटरमध्ये टाळ्यांचा कडकडाट

Pathaan | शाहरुखच्या ‘पठाण’मध्ये ‘भाईजान’ सलमानची धमाकेदार एण्ट्री; थिएटरमध्ये टाळ्यांचा कडकडाट

बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खान या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे. सलमानच्या एण्ट्रीचा सीन सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याच्या एण्ट्रीवर थिएटरमध्ये प्रेक्षकांकडून टाळ्यांचा कडकडाट होतोय, शिट्ट्या वाजवल्या जात आहेत.

मुंबई: अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट आज (25 जानेवारी) प्रदर्शित झाला. पठाणचा फर्स्ट डे फर्स्ट शो हाऊसफुल्ल होता. हा शो पाहिलेल्या प्रेक्षकांनी त्याला चार आणि पाच स्टार्स दिले आहेत. अनेकांना चित्रपटातील शाहरुखचा ॲक्शन अंदाज खूपच आवडला आहे. यामध्ये शाहरुखसोबत दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांच्याही भूमिका आहेत. तर बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खान या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे. सलमानच्या एण्ट्रीचा सीन सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याच्या एण्ट्रीवर थिएटरमध्ये प्रेक्षकांकडून टाळ्यांचा कडकडाट होतोय, शिट्ट्या वाजवल्या जात आहेत.
चित्रपटात मध्यांतरानंतर सलमान खानची धमाकेदार एण्ट्री होते. बऱ्याच वर्षांनंतर सलमान आणि शाहरुखला स्क्रीनवर एकत्र पाहणं ही चाहत्यांसाठी मोठी पर्वणीच आहे. थिएटरमध्ये जवळपास 10 मिनिटं चाहत्यांकडून टाळ्यांचा कडकडाट झाला आणि शिट्ट्या वाजवल्या गेल्या.
सलमानची एण्ट्री-

The Bhai enters the @BeingSalmanKhan #PathaanFirstDayFirstShow #PathaanReview pic.twitter.com/LrD5pJCmzH
— Goundamaniofficial (@Goundamanioffi1) January 25, 2023

ट्विटरवर नेटकऱ्यांकडून पठाणवर विविध प्रतिक्रिया येत आहेत. पठाण ही दोन विविध आइडिओलॉजीची कहाणी आहे. एक देशासाठी सर्वकाही पणाला लावणारा रॉ एजंट आहे तर दुसरा आपल्याच देशाविरोधात जाऊन शत्रूंशी हातमिळवणी करणारा जिम आहे. या दोघांची कथा फारच मनोरंजक आहे, मात्र काही त्यातील काही ॲक्शन सीन्स हे रिॲलिटीपासून दूर फक्त ड्रामा वाटू लागतात.
या चित्रपटात दीपिकाने ISI अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. जिमचा (जॉन अब्राहम) पाठलाग करता करता पठाणची भेट रुबिना मोहसिनशी (दीपिका पदुकोण) होते. ती जिमच्या बाजूने असली तरी रक्तबीज या मिशनसाठी ती पठाणशी हातमिळवणी करते.
पठाणमधील ‘बेशर्म रंग’ या गाण्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. यामध्ये दीपिकाने परिधान केलेल्या भगव्या बिकिनीवरून हा वाद सुरू झाला होता. बेशर्म रंग गाण्यात भगव्या बिकिनीमध्ये शाहरुख खानसोबत रोमान्स करतानाचा तिचा सीन आता चित्रपटातून कट करण्यात आला आहे.

Go to Source

Show More

Related Articles

Back to top button