OnePlus Nord CE 2 5G फोनवर १२ हजारांपर्यंत डिस्काउंट, जाणून घ्या या ऑफरबद्दल

OnePlus Nord CE 2 5G फोनवर १२ हजारांपर्यंत डिस्काउंट, जाणून घ्या या ऑफरबद्दल

१२,००० रुपयांपर्यंतच्या सूटसह मर्यादित कालावधीत खरेदी करता येईल. जाणून घ्या या खास ऑफरबद्दल

जर तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला मोठा ब्रँड हवा असेल, तर तुमच्यासाठी OnePlus Nord CE 2 5G हा एक चांगला पर्याय असू शकतो. वन प्लसचा हा स्मार्टफोन ५जी कनेक्टिव्हिटीसह येतो. हा वन प्लसचा फोन अॅमेझॉनवर (Amazon India) १२,००० रुपयांपर्यंतच्या सूटसह मर्यादित कालावधीत खरेदी करता येईल. फोनमध्ये ६४ मेगापिक्सल प्राइमरी सेन्सर, १६ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

जाणून घ्या तपशील

वनप्लस नॉर्ड सीई २ ५जी स्मार्टफोन सध्या अॅमेझॉनवर २४,९९९ रुपयांना सूचीबद्ध आहे. ही किंमत ८ जीबी रॅम आणि १२८जीबी स्टोरेज वेरिएंटची आहे. परंतु जर तुमच्याकडे जुना फोन असेल आणि तुम्हाला ते एक्सचेंज ऑफर अंतर्गत खरेदी करायचे असेल तर तुम्हाला १०,६५० रुपयांपर्यंत सूट मिळेल. याशिवाय, तुम्हाला ICICI बँक क्रेडिट, डेबिट आणि क्रेडिट कार्ड EMI व्यवहारांद्वारे फोन खरेदी केल्यास १,५००० रुपयांपर्यंत सूट मिळेल. ४,१६७ रुपयांपर्यंतच्या नो-कॉस्ट EMI वर फोन घेण्याची संधी आहे.

(हे ही वाचा: विश्लेषण: Call Recording करता येणारे सर्व Apps उद्यापासून होणार बंद, जाणून घ्या कारण)

काय आहेत स्पेसिफिकेशन?

वनप्लस नॉर्ड सीई २ ५जीमध्ये ६.४३ इंच फुलएचडी + एमोलेड डिस्प्ले आहे. स्क्रीनचा रिफ्रेश दर ९०Hz आहे. स्क्रीनच्या संरक्षणासाठी कॉर्निंग गोरिला ग्लास ५ देण्यात आला आहे. स्क्रीन HDR10+ ला सपोर्ट करते. फोनमध्ये मीडियाटेक डाइमेंसिटी ९०० प्रोसेसर देण्यात आला आहे. हा प्रोसेसर ५ जी सपोर्टसह येतो. वनप्लस नॉर्ड सीई २ ५जीमध्ये ६ जीबी रॅम आणि ८ जीबी रॅमसह १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज पर्याय आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 4500mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 65W SUPERVOOC चार्जिंगला सपोर्ट करते.

Go to Source

Show More

Related Articles

Back to top button