
जळगाव मिरर / १८ मार्च २०२३ । देशासह राज्यात ऐन लग्नसराईत आणि गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याचे दर अक्षरश: गगनाला भिडले आहेत. आतापर्यंतचा सर्वात उच्चांकी दर सोन्याने गाठल्याने टेन्शन वाढलं आहे. एमसीएक्स सोन्याने पहिल्यांदाच 59 हजार पार केलं असून आता साठीकडे वाटचाल सुरू केली आहे. MCX वर सोन्याच्या दरांनी नवा उच्चांक गाठला. एमसीएक्स गोल्डने पहिल्यांदाच 59000 ची […]
The post गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याच्या दराने मोडले सर्व रेकॉर्ड ! first appeared on Jalgaon Mirror News.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याच्या दराने मोडले सर्व रेकॉर्ड !
जळगाव मिरर / १८ मार्च २०२३ ।
देशासह राज्यात ऐन लग्नसराईत आणि गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याचे दर अक्षरश: गगनाला भिडले आहेत. आतापर्यंतचा सर्वात उच्चांकी दर सोन्याने गाठल्याने टेन्शन वाढलं आहे. एमसीएक्स सोन्याने पहिल्यांदाच 59 हजार पार केलं असून आता साठीकडे वाटचाल सुरू केली आहे. MCX वर सोन्याच्या दरांनी नवा उच्चांक गाठला.
एमसीएक्स गोल्डने पहिल्यांदाच 59000 ची पातळी ओलांडली. एमसीएक्सवर सोन्याने शुक्रवारी 59, 461 रुपयांचा नवा उच्चांक गाठला. जागतिक आर्थिक संकटाच्या वाढत्या चिंतेमुळे सोन्यात तेजी दिसून येत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. चांदीमध्ये सुमारे 1700 रुपयांची वाढ आहे. तो 68200 रुपये प्रति किलोच्या पातळीवर आहे.
युरोपियन सेंट्रल बँकेने (ECB) सलग सहाव्या बैठकीत व्याजदरात वाढ केल्याने शुक्रवारी सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ झाली. तज्ज्ञांच्या मते, ईसीबी दरात वाढ झाल्यानंतर, अमेरिकन डॉलरच्या दरावर दबाव आला आणि डॉलर निर्देशांक 104 च्या खाली घसरला. आंतरराष्ट्रीय मार्केटमधील स्थिती पाहता आता सोनं एकच तारणहार ठरत आहे. त्यामुळे सोन्यातील गुंतवणूक वाढली आहे. दुसरीकडे सोन्याचे दरही वाढत आहेत.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार यावर्षी आणखी भाव वाढू शकतात. सोन्याचे दर 60 हजारच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. कमोडिटी मार्केट तज्ज्ञांच्या मते, सिलिकॉन व्हॅली बँकेच्या संकटानंतर लोक सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहात आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार इतर मालमत्तेतून पैसे काढून सोन्यात टाकत आहेत, ज्यामुळे सोन्याच्या वाढीला आधार मिळत असल्याचे सांगण्यात आले. जागतिक बाजारपेठेबद्दल बोलायचे झाले तर सोन्याचा भाव $1,928 प्रति औंस झाला आणि चांदी 21.87 डॉलर प्रति औंस झाली
The post गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याच्या दराने मोडले सर्व रेकॉर्ड ! first appeared on Jalgaon Mirror News.