‘या’ तारखेला जन्मलेले लोक खूपच रोमॅंटिक आणि कला प्रेमी असतात

‘या’ तारखेला जन्मलेले लोक खूपच रोमॅंटिक आणि कला प्रेमी असतात

अंकशास्त्रानुसार आपल्या जीवनात संख्यांना महत्त्वाचे स्थान आहे. आपण पाहिले असेल की काही संख्या आपल्यासाठी लकी असतात तर काही संख्या अशुभ असतात.

Effect of Number Six: अंकशास्त्रानुसार आपल्या जीवनात संख्यांना महत्त्वाचे स्थान आहे. आपण पाहिले असेल की काही संख्या आपल्यासाठी लकी असतात तर काही संख्या अशुभ असतात. आजकाल अनेकजण आपला मोबाईल नंबर आणि वाहन क्रमांक खूप विचारपूर्वक निवडतात, हे तुम्ही पाहिलेच असेल. ते फक्त तेच आकडे निवडतात जे त्यांच्यासाठी शुभ असतात.

१ ते ९ या अंकांचे वर्णन अंकशास्त्रात उपलब्ध आहे. या संख्या एका किंवा दुसऱ्या ग्रहाशी संबंधित आहेत. आज आपण मूलांक ६ बद्दल बोलणार आहोत. मूलांक ६ चा स्वामी शुक्र देव आहे. जे धन, वैभव, भौतिक सुख आणि ऐश्वर्य यांचे कारक मानले जातात. महिन्याच्या ६, १५ किंवा २४ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ६ असतो. या लोकांमध्ये आकर्षक व्यक्तिमत्त्व असतं आणि ते रोमँटिक असतात. त्याचबरोबर हे लोक आपल्या बोलण्याने आणि वागण्याने कोणाचेही लक्ष वेधून घेण्यात पटाईत असतात. चला जाणून घेऊया मूलांक ६ शी संबंधित लोकांच्या खास गोष्टी…

आणखी वाचा : २०२४ पर्यंत या ३ राशींवर शनिदेवाची राहील कृपा! अमाप पैसा आणि प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता

रोमँटिक आणि कला प्रेमी असतात: ६ क्रमांकाचा स्वामी शुक्र ग्रह मानला जातो. जे प्रेम, रोमान्स आणि शांतीचे प्रतीक मानले जाते. मूलांक ६ असलेले लोक शरीराने मजबूत असतात आणि त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते. असे मानले जाते की या लोकांचे वृद्धत्व लवकर दिसत नाही. हे लोक कला आणि मनोरंजन प्रेमी असतात आणि सौंदर्याकडे लवकर आकर्षित होतात. तसंच ते त्यांच्या पहिल्या भेटीतच कुणालाही वेड लावू शकतात. मैत्री जपण्यात हे लोक उत्तम असतात. हे लोक एखाद्याला भेटले की पहिल्या भेटीतच पूर्ण नम्रतेने भेटतात. हे लोक इतरांच्या दु:खात सोबत असतात.

विलासी जीवन जगायला आवडते:या लोकांना विलासी जीवन जगणे आवडते. तसेच या लोकांना महागड्या वस्तू घेण्याचा शौक असतो. या लोकांना जीवनातील सर्व सुख-सुविधा मिळतात. लहानपणापासूनच हे लोक आपल्या करिअरचा विचार करायला लागतात आणि यश मिळवण्यासाठी मेहनत करतात.

आणखी वाचा : Shani Dev: जुलैमध्ये शनिदेव वक्री अवस्थेत, या राशींवर होणार धैय्याचा प्रभाव

या क्षेत्रात चांगले नाव आणि पैसा कमवा:शुक्र ग्रहाच्या प्रभावामुळे त्यांना चित्रपट, माध्यम, नाटक, अन्न, वस्त्र, दागिने यांच्याशी संबंधित कामात अधिक यश मिळण्याची शक्यता आहे. यासोबत कपडे, चैनीच्या वस्तू, सोने, चांदी आणि हिरे यांच्याशी संबंधित व्यवसाय त्यांना खूप प्रगती देतो. त्यांचे मूलांक ६, १५ आणि २४ च्या लोकांसोबत खूप चांगलं पटतं. तसंच मूलांक २, ३ आणि ९ असणार्‍यांसाठी देखील चांगले आहेत. हलका निळा, हलका गुलाबी आणि पांढरा रंग तुमच्यासाठी सर्वात शुभ मानला जातो. हा रंगीत रुमाल तुम्ही नेहमी हातात ठेवू शकता. जे तुमच्यासाठी लकी चार्म ठरू शकतं.

Go to Source

Show More

Related Articles

Back to top button
DMCA.com Protection Status