वाढदिवशी कुणालाही भेटू शकणार नाही, राज ठाकरेंचा मनसैनिकांना संदेश

वाढदिवशी कुणालाही भेटू शकणार नाही, राज ठाकरेंचा मनसैनिकांना संदेश

14 जून रोजी राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे. राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यकर्ते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येतात. पण यावेळी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आव्हान केलं आहे.  राज ठाकरे यांनी ट्विटरद्वारे आव्हान केलं आहे की, कुणीही शुभेच्छा देण्यासाठी शिवतीर्थ निवासस्थानी येऊ नये. कारण भेटीगाठीतून संसर्ग वाढला तर पुन्हा शस्त्रक्रिया पुढे ढकलावी लागेल. यासंदर्भात त्यांची एक ऑडिओ क्लिपही त्यांनी जारी केली आहे.ते पुढे म्हणाले की, त्यादिवशी आपली पुण्याला जी सभा झाली. त्यावेळी सर्वांना सांगितलं की माझी एक शस्त्रक्रिया करायची आहे. जेव्हा मी रुग्णालयात दाखल झालो आणि सगळ्या चाचण्या झाल्या आणि रात्री मला डॉक्टरांनी सांगितलं की कोविडचा डेड सेल आहे. आता ते काय असतं हे मलाही माहिती नाही आणि कुणालाही माहिती नाही, असो… आणि मग ती शस्त्रक्रिया रद्द झाली. आता परत करायची… त्यानंतर मी आता कोविडनंतर साधारणपणे 10, 12, 15 दिवस क्वारंटाईनमध्ये असतो आपण, त्याप्रमाणे घरी आहे. या सगळ्या दरम्यान 14 तारखेला माझा वाढदिवस आलाय. आपण सर्वजण दरवर्षी माझ्या वाढदिवसाला मला भेटायला येत असता, मी ही आपली आतुरतेने वाट पाहत असतो, सर्वांना भेटून बरंही वाटतं. पण यावेळी 14 तारखेला मला वाढदिवसाला कुणाला म्हणजे कुणालाही भेटता येणार नाही. याचं कारण परत गाठीभेटीमध्ये परत संसर्ग झाला आणि परत शस्त्रक्रिया पुढे ढकलावी लागली तर ती किती पुढे ढकलावी यालाही काही मर्यादा असतात. पुढील आठवड्यात माझी शस्त्रक्रिया ठरलेली आहे. त्यामुळे मी कुठल्याही प्रकारचा धोका पत्करू इच्छित नाही. म्हणून मी 14 तारखेला कुणालाही न भेटण्याचा निर्णय केलेला आहे. आपण जिथे आहात तिथेच राहा. माझी शस्त्रक्रिया होईल, जरा बरं वाटायला लागेल तेव्हा आपल्याला निश्चित भेटेन. पण 14 तारखेला आपण कृपया कुणी घरी येऊ नये ही विनंती करण्यासाठी आपल्याशी बोलतोय.राज ठाकरे यांच्यावर 1 जून रोजी लिलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया होणार होती. त्यासाठी ते रुग्णालयात दाखलही झाले. त्यावेळी शस्त्रक्रियेपूर्वी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असता त्यांच्या शरिरात कोरोनाच्या मृत पेशी आढळून आल्या. त्यामुळे त्या दिवशीची त्यांच्यावरील शस्त्रक्रिया रद्द करण्यात आली. आता राज ठाकरे यांच्यावर पुढील आठवड्यात शस्त्रक्रिया होणार आहे. त्यामुळे 14 जून रोजी वाढदिवसाला कुणीही भेटायला येऊ नये, असं आवाहन त्यांनी केलंय.हेही वाचामनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

Go to Source

Show More

Related Articles

Back to top button
DMCA.com Protection Status