गुन्हेगारीबातम्या

संत नगरी ला गालबोट : शेगाव येथे ५० वर्षीय नराधमाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस : भारत लाईव्ह न्यूज मीडिया !

बुलढाणा : प्रतिनिधि , बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव आपल्या संत भूमी मुळे अवघ्या महाराष्ट्र राज्यात प्रचलित आहे. संतभूमी समजल्या जाणाऱ्या ह्या धर्तीवर मात्र आज एक माणुसकी लाजवेल अशी घटना उघडकीस आली आहे.

राज्यातील महिला आणि अल्पवयीन मुलीवर होणाऱ्या अत्याचाराच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. सरकारी धोरणे आणि कठोर कायदे अस्तित्वात आले तरी देखील याच पार्श्वभूमीवर बुलढाणा येथील एका घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना शेगाव येथे घडली असून पोलिसानी ५० वर्षीय आरोपीला बेड्या ठोकल्या आहे. याप्रकरणी पोलीस दळतर्फे अधिक तपास सुरू आहे.

आता पर्यन्त मिळालेल्या माहितीनुसार, गणेश शेजाळे असे अटक करण्यात आलेल्या नराधम आरोपीचे नाव आहे. आरोपीने शेगाव येथील १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलीच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध बलात्कार आणि पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुलढाणा पोलीसांनी आरोपी यास त्वरित अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. ब्यूरो रिपोर्ट भारत लाईव्ह न्यूज मीडिया !

Related Articles

Leave a Reply

Back to top button
DMCA.com Protection Status