ऍस्ट्रोलॉजी

मंगळदेव मंदिर महाप्रसादात अन्न बचाव मोहिम यशस्वी

मंगळदेव मंदिर महाप्रसादात अन्न बचाव मोहिम यशस्वी

अन्न जेवढे पोटासाठी हवे तेवढेच ताटात घेतले पाहिजे. तरच अन्नाचे महत्त्व कळते आणि शेतकऱ्यांच्या श्रमाचा सन्मान होतो. मंगळग्रह मंदिरातर्फे दर मंगळवारी महाप्रसाद स्थळी भाविकांना अन्नाचे महत्त्व सांगितले जाते. रिकामी भोजनथाळी डस्टबिनमध्ये टाकताना काही …

विश्वस्तांनाही भोजन संपविण्याचा आग्रह

 

सेवेकर्‍यांच्या पाठीवर शाबासकीची थाप  

 

अमळनेर (जिल्हा जळगाव) – अन्न जेवढे पोटासाठी हवे तेवढेच ताटात घेतले पाहिजे. तरच अन्नाचे महत्त्व कळते आणि शेतकऱ्यांच्या श्रमाचा सन्मान होतो. मंगळग्रह मंदिरातर्फे दर मंगळवारी महाप्रसाद स्थळी भाविकांना अन्नाचे महत्त्व सांगितले जाते. रिकामी भोजनथाळी डस्टबिनमध्ये टाकताना काही सेवेकरी थाळीत उष्टे टाकलेले नाही ना ? याची पाहणी करतात व उष्टे टाकलेले अन्न संपवायचा आग्रह करतात. हे कार्य निष्ठेने करणाऱ्या काही युवा सेवेकरींचा आज विश्वस्तांनी सत्कार केला.

 

मंदिरात मंगळवारी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. हजारो भाविक प्रसादाचा लाभ घेतात. शुद्ध तुपामध्ये हा प्रसाद तयार केला जातो. काही भाविक गरजेपेक्षा जास्त अन्न ताटात घेतात. जेव्हा की भोजन वाढपी सेवेकरी भाविकांना जेवढे हवे तेवढेच अन्न ताटात घ्या हा आग्रह करतात. तरीही काही गरजेपेक्षा जास्त अन्न घेतात. ते वाया जात असते. आजही महाप्रसाद वाटपानंतर काही भावा उष्टे अन्न टाकून देत होते. तेव्हा भाविकांनी ते खाण्याचा आग्रह केला.

 

सेवेकरी निलेश पवार,नयन दाभाडे, सुनील चव्हाण, विशाल दाभाडे, अक्षय राजपूत यांच्या या कार्याची दखल विश्वतांनी घेतली. याला कारणही घडले. आज एका विश्वस्तांनाक भाजी संपविण्याचा आग्रह सेवेकरींनी केला. या सर्वांचा सत्कार विश्वस्तांनी केला. यावेळी भोजनगृह प्रमुख हेमंत गुजराथी हजर होते.

Go to Source

Show More

Related Articles

Back to top button
DMCA.com Protection Status