बातम्या

ऑडी कार ते लाखोंचं वॉच.. केएल राहुल-अथिया शेट्टीला लग्नात मिळाल्या कोट्यवधींच्या भेटवस्तू

ऑडी कार ते लाखोंचं वॉच.. केएल राहुल-अथिया शेट्टीला लग्नात मिळाल्या कोट्यवधींच्या भेटवस्तू

अथिया आणि राहुलच्या लग्नाला मोजकेच पाहुणे उपस्थित होते. मात्र या पाहुण्यांकडून नवविवाहित जोडप्यावर महागड्या भेटवस्तूंचा वर्षाव केला. ऑडी कारपासून ते लाखो रुपयांच्या परफ्युमपर्यंत अनेक भेटवस्तू अथिया आणि राहुलला मिळाल्या आहेत.

मुंबई: टीम इंडियाचा स्टार फलंदाज केएल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी यांनी नुकतीच लग्नगाठ बांधली. अभिनेते सुनील शेट्टी यांच्या खंडाळा इथल्या फार्महाऊसवर हा लग्नसोहळा पार पडला. अथिया आणि राहुलच्या लग्नाला मोजकेच पाहुणे उपस्थित होते. मात्र या पाहुण्यांकडून नवविवाहित जोडप्यावर महागड्या भेटवस्तूंचा वर्षाव केला. ऑडी कारपासून ते लाखो रुपयांच्या परफ्युमपर्यंत अनेक भेटवस्तू अथिया आणि राहुलला मिळाल्या आहेत.
अथियाचे वडील सुनील शेट्टी यांनी त्यांच्या मुलीला मुंबईतील एक अपार्टमेंट भेट म्हणून दिल्याचं कळतंय. या अपार्टमेंटची किंमत तब्बल 50 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे. सुनील शेट्टी यांच्या व्यतिरिक्त इतर सेलिब्रिटींनीही महागड्या भेटवस्तू दिल्या आहेत.
अभिनेता सलमान खान आणि सुनील शेट्टी यांची खूप चांगली मैत्री आहे. सलमानने अथिया आणि राहुलला ऑडी कार भेट म्हणून दिली आहे. या कारची किंमत जवळपास 1.63 कोटी रुपये असल्याचं कळतंय. जॅकी श्रॉफ हे अथियाला त्यांच्या मुलीसारखंच मानतात. त्यांनी अथियाला चोपार्ड ब्रँडचं 30 लाख रुपयांचं घड्याळ दिलं आहे.

 

View this post on Instagram

 
A post shared by Athiya Shetty (@athiyashetty)

अभिनेता अर्जुन कपूर आणि अथिया हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. त्यामुळे मैत्रिणीच्या लग्नात त्याने खास डायमंडचं ब्रेसलेट तिला भेट दिलंय. ज्याची किंमत दीड कोटी रुपये असल्याचं कळतंय.
फक्त बॉलिवूड स्टार्सच नाही तर क्रिकेट विश्वातील सेलिब्रिटींनीही अथिया आणि राहुलला आलिशान भेटवस्तू दिल्या आहेत. याबाबतीत विराट कोहलीसुद्धा किंग ठरला आहे. विराटने केएल राहुलला बीएमडब्ल्यू कार भेट दिली आहे. त्या कारची किंमत जवळपास 2.17 कोटी रुपये असल्याचं समजतंय.
महेंद्र सिंह धोनीनेही या लग्नाला हजेरी लावली होती. अथिया आणि राहुलला आशीर्वादासह त्याने कावासाकी निंजा बाइक भेट म्हणून दिली. या बाइकची बाजारातील किंमत जवळपास 80 लाख रुपये असल्याचं कळतंय.

Go to Source

Show More

Related Articles

Back to top button