जुन्नर: विद्यार्थ्याचे केस पकडून शिक्षकांची लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्याचा निंदनीय प्रकार घडला आहे. : भारत लाईव्ह न्यूज मीडिया !


जुन्नर : वृत्त प्रतिनिधी , जुन्नर येथील एक शाळेच्या आवारात काही शिक्षक एक विद्यार्थ्याला जबर लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्याचा प्रकार घडला आहे.
जुन्नर येथील ज्ञानमंदिर जुनिअर कॉलेज मध्ये ११ वित शिकणाऱ्या ह्या विद्यार्थ्याला अश्या प्रकारे मारहाण का झाली ? स्वतः शिक्षक इतर शिक्षकांना मदतीला घेऊन एकट्या विद्यार्थ्याला गंभीर रित्या मारहाण करत असल्याची हि बाब अत्यंत निंदनीय आहे.
ईतर बघ्यांनी ह्या प्रकरणाची छोटीशी व्हिडीओ रेकॉर्डिंग करत व्हिडीओ सोशिअल माध्यम वर शेअर केला आहे. ज्यामुळे संबंधित प्रकाराची घटने ला वाचा फुटली आहे.
ज्या प्रकारे विडिओ मध्ये इतर शिक्षक मारण्यात मदत करत आहेत. नक्कीच काहीतरी मोठी घटना येथे घडल्याचा अंदाज आहे. तसेच जरी विद्यार्थ्यांची काही चूक असेल तर ह्या प्रकारे अमानुषी मारहाण करणे कितपत योग्य वाटते. तेही आपण कर्तव्यावरील शिक्षक असतांना. हजारो पाल्यांच्या जबाबदाऱ्या ह्या शिक्षक मंडळींवर पालक आमच्या पाल्यांचा तुम्ही शिक्षण देऊन विकास करणार ह्या अपेक्षेने देत असतात. परंतु ह्या प्रकारची अमानुषी वागणूक शिक्षा देऊन काय संदेश आपण सार्वजनिक करत आहेत.
विद्यार्थ्यांचे केस पकडून , फ्री स्टाईल हाणामारी करणारे शिक्षक गुंड गिरी मार्गाने विद्यार्थ्यांना कुठले शासन लावतील ? असल्या मानसिकतेच्या शिक्षकांना त्वरित ह्या जबाबदारीतून मुक्त करण्यात यावे.
सदर , घटनेची चहू बाजूने निंदा होत आहे. सदर शैक्षणिक मंडळाची ह्या बाबतीत योग्य ती दाखल घेऊन संबंधित दोषी ह्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही होणे साठी पुढे येणे गरजेचे आहे. मुख्याध्यापक ह्यांनी सदर बाबीतीची तक्रार पोलीस ह्यांचे कडे केली आहे का ? महिला व बाल विकास तसेच शिक्षण विभाग आणि मानवी हक्क आयोग ह्यांनी सज्ञान घेऊन त्वरित कार्यवाही करणे गरजेचे आहे. बयूरो रिपोर्ट भारत लाईव्ह न्यूज मीडिया !