जिगाव प्रकल्प लगत पात्रातून अवैध वाळू खनन उच्चांकी वर : भारत लाईव्ह न्यूज मीडिया !
नांदुरा महसूल प्रशासनाची मेहेरबानी असल्याची चर्चा


बुलढाणा : धनवीरसिंग ठाकूर , नांदुरा तालुक्यातील जिगाव येथील प्रकल्पालगत असलेल्या नाले , नदी पात्रातून सर्रास अवैध वाळू उत्खनन पूर्ण उचांकी वर असल्याचे धक्कादायक वृत्त बाहेर येत असून. जिगाव प्रकल्प येथे आमच्या शोध पत्रकारांनी बातमीची पडताळणी करण्यासाठी भेट दिली असता. मीडिया वाले येत असल्याचे फोन चहू बाजूंनी सुरु झाले आणि चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या तस्करांची मोटेखानी धांदल उडाली होती. तरीही , आमच्या प्रतिनिधी घटना ठिकाणी पोहोचण्या पर्यंत तेथून वाळू भरून ट्रक , ट्रेकर्स आणि जेसीबी मशीन ह्यांची गर्दी भरून परततांना दिसल्या.
तसेच , पात्राच्या किनारी असलेल्या वाळू उत्खनन कामी येणाऱ्या लोखंडी पत्र्याच्या बोटी , इतर अवजारे दिसून आले. सोबतच झुडुपां मध्ये मोठे मोठे वाळूचे ढिगारे दिसले. नदी पात्राच्या वरच विविध टोळ्यांनी आप आपली वाळू जमा करून थप्पी मारून ठेवलेले दिसले. वाळू तस्करांना ग्रामस्थ बातमीदारांनीं आधीच सूचित केल्यामुळे तेथून सर्वानी आधीच पळ काढून घेतला. संबंधित घटनेच्या भेटी नंतर नांदुरा महसूल प्रशासनाची प्रतिक्रिया तसेच कार्यवाही संबंधी संपर्क केले असता तेथून संपर्क जुळून आला नाही.
जिगाव ला जोडणाऱ्या रस्त्याच्या लागत असलेल्या अनेक ग्राम वासियांची संतप्त प्रतिक्रिया मिळाल्या. रात्रभर चोरटी वाळू वाहणारे अवजड ट्र्क भरधाव वेगात गावातून पसार होतात. मद्यपान केलेल्या चालकांना लोकांच्या जीविताशी खेळण्याची परवानगी कुठल्या शासकीय अधिकाऱ्यांच्या मेहेरबानीने सुरु असल्याची मोठी चर्चा हि सार्वत्रिक रित्या सुरु आहे.
नवनियुक्त जिल्हाधिकारी ह्यांनी तत्परतेने संबंधित बाबी कडे लक्ष न दिल्यास. सामाजिक स्तरावरून जण आंदोलन होण्याची संकेत हि ह्या वेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली. बयूरो रिपोर्ट भारत लाईव्ह न्यूज मीडिया !