जळगाव : वाळू चोरट्यांचा कायमी प्रतिबंध करणे शक्य नाहीच का ? महसूल सह पोलीस प्रशासन बघ्याच्या भूमिकेत : भारत लाईव्ह न्यूज मीडिया !


जळगाव : धनवीरसिंग ठाकूर , जळगाव जिल्हा ला ताप्ती नदी , गिरणा नदी पात्र जोडलेले आहेत. ज्यामुळे पूर्ण जिल्ह्याला पाणी पुरवठा योग्य प्रमाणात होत असतो. परंतु अनेक वर्षां पासून सुरु असलेल्या अवैध वाळू उत्तखनन मुळे नदी पात्रांच्या तळाशी असलेल्या अमूल्य वाळू खनिज बेहिशोबी उत्तखनन सुरु असल्यामुळे नदी मधील असलेल्या सजीव सह नदीच्या पाण्याचा प्रवाह ह्यावर मोठा परिणाम घडत आहे. जिल्हा महसूल सह राज्य शासनाच्या तिजोरीवर सुद्धा कोट्या वधी रुपयांची महसूल चोरी होत असून. काही प्रशासकीय अधिकारीच वाळू तस्करांच्या समवेत असल्यामुळे हे सर्व घडत असल्याचे बोलल्या जात आहे. महिन्याचे ठरलेले हफ्ते ठीक ठिकाणी पोहचत असल्यामुळे वाळू तस्करांची अवैध कामाला कुठलाच अडथळा नसल्याने दिवसा ढवळ्या बेनंबरी टिप्पर शहरातून धावत आहेत. ह्या वाळू भरलेल्या अवजड वाहनाच्या कुठल्याच बाजूने कुठलेच नंबर दिसून येत नाहीत ज्या मुळे नेमके हे ट्रक मालक धारक कोण हे कधीच बाहेर येत नाही. सोबत पोलीस प्रशासनाच्या समोरच हे ट्रक ये जा करीत असतानाही कुठल्याच पोलीस स्टेशन मध्ये ह्या बद्दल कुठलीच कार्यवाही होत नसल्याचेही खेद सामान्यजन वर्तवत आहेत.
पोलीस यंत्रणेसह महसूल प्रशासन हि हतबल सिद्ध होत आहे. जनता वारंवार ह्या भरधाव वाहनांच्या समोर बळी पडत असतांना जबाबदार अधिकारी ह्या काळ्याबाजाराची काही दाखल घेतील का ? अनेकवेळेस हे अवजड वाहन चालक मद्यपान करून आपल्यासह रस्त्यावरील अन्य वाहन चालकांच्या जीवालाही धोका उत्पन्न करीत असतात. परंतु , त्यांचे वर कुठलीच दंडात्मक कार्यवाही का करण्यात येत नाही ? जळगाव जिल्ह्यात नेमका पोलीस प्रशासनाची कुठलीच भीती शिल्लक राहिली नसल्या सारखी परिस्थिती उत्पन्न झाली असतांना नवनियुक्त पोलीस अधीक्षक ह्या बाबतीत काही कार्यवाही करून जिल्ह्यात पोलीस बल सक्षम असल्याचा दाखला देतील कि नाही ? अशी माफक मागणी जळगाव शहरवासीय मांडत आहेत. बयूरो रिपोर्ट भारत लाईव्ह न्यूज मीडिया !