६० कोटींपर्यंतची बोली?; ‘आयपीएल’ प्रसारण हक्क लिलाव प्रक्रिया आज; स्टार, व्हायकॉम १८, सोनी-झी शर्यतीत

६० कोटींपर्यंतची बोली?; ‘आयपीएल’ प्रसारण हक्क लिलाव प्रक्रिया आज; स्टार, व्हायकॉम १८, सोनी-झी शर्यतीत

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) या जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या पुढील पाच हंगामांसाठी (२०२३ ते २०२७) प्रसारण हक्कांच्या लिलाव प्रक्रियेला रविवारपासून सुरुवात होणार आहे.

फायनॅन्शियल एक्स्प्रेस, मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) या जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या पुढील पाच हंगामांसाठी (२०२३ ते २०२७) प्रसारण हक्कांच्या लिलाव प्रक्रियेला रविवारपासून सुरुवात होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या प्रक्रियेत प्रसारण हक्क मिळवण्यासाठी भारतातील आघाडीचे समूह साधारण ६० कोटी रुपयांपर्यंतची बोली लावणे अपेक्षित आहे.

‘आयपीएल’चे आतापर्यंत १५ हंगाम झाले असून हंगामागणिक या स्पर्धेची लोकप्रियता आणि मूल्य वाढल्याचे चित्र आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) सर्वाधिक महसूल या स्पर्धेमार्फत मिळतो. त्यामुळे या स्पर्धेचे प्रसारण हक्क मिळवण्यासाठी व्हायकॉम १८, वॉल्ट डिझ्नी (स्टार) आणि सोनी-झी हे तीन समूह मोठी बोली लावतील अशी ‘बीसीसीआय’ला अपेक्षा आहे.

मुंबईत ई-लिलावाच्या माध्यमातून होणाऱ्या या प्रक्रियेला सकाळी ११ वाजता सुरुवात होईल. यंदा प्रसारण हक्कांची लिलाव प्रक्रिया चार विभागांमध्ये पार पडेल. २०१७ मध्ये झालेल्या गेल्या लिलाव प्रक्रियेत स्टार इंडियाने १६,३४७.५ कोटी रुपयांसह पाच हंगामांसाठीचे (२०१८-२२) प्रसारण हक्क मिळवले होते. यंदा मात्र या रकमेत मोठी वाढ होणार आहे.

ई-लिलाव प्रक्रिया

२०१७ मध्ये झालेली ‘आयपीएल’ प्रसारण हक्कांची मागील लिलाव प्रक्रिया ‘क्लोज-बिड’ पद्धतीने झाली होती. या पद्धतीनुसार, समूहांना आपली सर्वात मोठी बोली लावण्यास सांगण्यात आले होते. त्यांना प्रतिस्पर्धी समूहांच्या बोलींची कल्पना नव्हती. अखेरीस सर्वाधिक बोली असलेल्या समूहाला विजेता घोषित करण्यात आले होते. यंदा मात्र या पद्धतीत बदल करण्यात आला आहे. ‘आयपीएल’च्या पुढील पाच हंगामांचे प्रसारण हक्क मिळवण्यास उत्सुक समूह यंदा ई-लिलावात ऑनलाइन पद्धतीने बोली लावतील. प्रतिस्पर्धी मागे हटत नाहीत, तोपर्यंत समूहांना आपली बोली वाढवण्याची मुभा असेल. सर्वाधिक बोली लावणाऱ्या समूहाला ‘आयपीएल’चे प्रसारण हक्क प्राप्त होतील. अ आणि ब विभागांसाठी एकाच वेळी बोली लावण्यात येईल. ही प्रक्रिया झाल्यानंतर क आणि ड विभागांसाठी विविध समूह बोली लावतील.

अ विभाग

भारतीय उपखंडातील टीव्ही (प्रसारण) हक्क

४९ कोटी रुपये प्रति सामना एकूण : १८,१३० कोटी रूपये (७४ सामने  ७ ४९ कोटी प्रति सामना  ७ ५ हंगाम)

ब विभाग

भारतीय उपखंडासाठी डिजिटल माध्यमांचे हक्क

३३ कोटी रुपये प्रति सामना एकूण : १२,२१० कोटी (७४ सामने  ७ ३३ कोटी प्रति सामना  ७ ५ हंगाम)

क विभाग

डिजिटल माध्यमांमध्ये प्रत्येक हंगामात निवडक १८ सामने सलामीचा सामना, अंतिम सामना, बाद फेरीचे सामने समाविष्ट)

११ कोटी रुपये प्रति सामना एकूण : ९९० कोटी (१८ सामने  ७ ११ कोटी प्रति सामना  ७ ५ हंगाम)

ड विभाग

परदेशातील टीव्ही व डिजिटल हक्क यांसाठी लिलाव होणार आहे.

३ कोटी रुपये प्रति सामना एकूण : १११० कोटी (७४ सामने  ७ ३ कोटी प्रति सामना  ७ ५ हंगाम)

चार विभागांमध्ये लिलाव

यंदा चार विभागांमध्ये प्रसारण हक्क दिले जाणार आहेत. अ-विभागात भारतीय उपखंडातील टीव्ही हक्क, ब-विभागात भारतीय उपखंडासाठी डिजिटल माध्यमांचे हक्क, क-विभागात डिजिटल माध्यमांमध्ये प्रत्येक हंगामात निवडक १८ सामने आणि ड-विभागात परदेशातील टीव्ही व डिजिटल हक्क यांसाठी लिलाव होणार आहे.

Go to Source

Related Articles

Back to top button
DMCA.com Protection Status