बातम्या

टीम इंडिया आशिया कपसाठी पाकिस्तानला जाणार? पीसीबी अध्यक्षांची मोठी माहिती

टीम इंडिया आशिया कपसाठी पाकिस्तानला जाणार? पीसीबी अध्यक्षांची मोठी माहिती

पाकिस्तानकडे आशिया कप 2023 चं यजमानपद आहे. यानंतर भारतात वनडे वर्ल्ड कप 2023 पार पडणार आहे. टीम इंडिया आशिया कपसाठी पाकिस्तानला जाणार नाही.

मुंबई : टीम इंडिया आणि पाकिस्तान, दोन्ही कट्टर आणि चीर प्रतिद्वंदी. दोन्ही टीम आयसीसी आणि आशिया कप स्पर्धेतच खेळतात. यंदा आशिया कपचं आयोजन हे पाकिस्तानमध्ये करण्यात आलं आहे. त्यामुळे टीम इंडियाचा आशिया कपसाठी पाकिस्तानात जाण्याचा विरोध आता मावळल्याचं दिसतंय. काहीही झालं तरी आम्ही पाकिस्तानला जाणार नाही, असं बीसीसीआय अध्यक्ष आणि आशिया क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह म्हणाले होते. मात्र आता पीसीही अध्यक्ष नजीम सेठी यांनी मोठा खुलासा केलाय.
जय शाह यांच्या कठोर भूमिकेनंतर तत्कालिन पीसीबी अध्यक्ष रमीज राझानेही जशास तसं उत्तर दिलं होतं. जर टीम इंडिया आशिया कपसाठी पाकिस्तानमध्ये आली नाही, तर आम्हीही भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपसाठी येणार नाही, अशी धमकीच रमीज राजाने दिली होती.
जय शाह एशियन क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष आहेत. जय शाह यांनी एसीसी अध्यक्ष या नात्याने 2023-24 या 2 वर्षांसाठी आशियाई क्रिकेटचं शेड्यूल जाहीर केलं होतं. यामध्ये एशिया कपचाही समावेश होता. मात्र यामध्ये एशिया कप सामन्यांच्या तारखा आणि ठिकाण जाहीर करण्यात आलं नाही. त्यामुळे आशिया कपचं आयोजन हे पाकिस्तानऐवजी त्रयस्थ ठिकाणी केलं जाईल, अशी चर्चा होती.
या सर्व घडामोडी दरम्यान नजम सेठी हे पीसीबी अध्यक्ष झाले. सेठी यांनी वादग्रस्त विधान न करता समजुतदारपणे मधला मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले. सेठी यांनी जय शाह यांच्यासोबत बैठक घेतली. बैठकीत या मुद्द्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आता एसीसीची पुढील बैठक ही 4 फेब्रुवारीला होणार आहे. या बैठकीचं आयोजन हे बहरीममध्ये करण्यात आल्याची माहिती सेठी यांनी दिली आहे.
आशिया कप आणि वर्ल्ड कपचा मुद्दा आहे. तर बीसीसीआय अजूनही आपल्या भूमिकेवर ठाम आहे. पाकिस्तानने भारत दौऱ्यावर यावं, असं त्यांना वाटतंय. पण टीम इंडिया पाकिस्तानात येणार नाही. आता यावर आमची भूमिका काय आहे हे बैठकीनंतरच सांगता येईल, असं सेठी यांनी नमूद केलं.
सेठी काय म्हणाले?
“अखेर आम्हाला एसीसीकडून बैठकीसाठी तारीख मिळाली आहे. 4 फेब्रुवारीला बहरीनमध्ये बैठक होणार आहे. या बैठकीत मी सहभागी होणार आहे. मी आत्ताच माझी भूमिका सांगू शकत नाही. पाकिस्तानने भारतात यावं असं बीसीसीआयला वाटतं. मात्र टीम इंडियाने पाकिस्तानात खेळावं असं त्यांना वाटत नाही. ही आमच्यासाठी काही नवीन बाब नाही”, असं सेठी यांनी स्पष्ट केलं.

Go to Source

Show More

Related Articles

Back to top button
DMCA.com Protection Status