बातम्या

INDvsNZ : टीम इंडियाचा 13 वर्षांनंतर मोठा कारनामा, जाणून घ्या

INDvsNZ : टीम इंडियाचा 13 वर्षांनंतर मोठा कारनामा, जाणून घ्या

न्यूझीलंडला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाकडून 90 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. यासह न्यूझीलंडला या 3 सामन्यांच्या मालिकेत एकही विजय मिळवता आला नाही.

इंदूर : टीम इंडियाने न्यूझीलंडला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 90 धावांनी पराभूत केलं. या विजयासह भारताने न्यूझीलंडला 3-0 अशा फरकाने क्लीन स्वीप केलं. टीम इंडियाने पहिले बँटिंग करताना 385 धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडला 41.2 ओव्हरमध्ये 295 धावांर गुंडाळलं. टीम इंडियाच्या या विजयाची वैशिष्ट्य आपण जाणून घेऊयात.
टीम इंडियाने न्यूझीलंडला 3-0 ने पराभूत केलं. टीम इंडियाचा भारतात सलग सातवा मालिका विजय ठरला. याआधी टीम इंडियाने श्रीलंकेलाही 3-0 ने पराभूत केलं होतं.
टीम इंडियाने गेल्या 5 वनडे सामन्यात पहिले बॅटिंग करताना विशाल स्कोअर उभारला. टीम इंडियाने 4 वेळा 350 पेक्षा अधिक धावा केल्या. तर एकदा न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताने 349 धावा केल्या होत्या.
रोहित शर्मा असा पहिला भारतीय कर्णधार ठरलाय, ज्याच्या नेतृत्वात भारताने न्यूझीलंडला टी 20 आणि वनडे सीरिजमध्ये क्लीन स्वीप केलंय. आधी टीम इंडियाने न्यूझीलंडला 2021-22 मध्ये रोहितच्या नेतृत्वात 3-0 ने अस्मान दाखवलं होतं.
तसेच टीम इंडियाने न्यूझीलंडला 13 वर्षांनंतर वनडे सीरिजमध्ये क्लीन स्वीप केलंय. याआधी टीम इंडियाने न्यूझीलंडला 2010-11 साली 5 सामन्यांच्या वनडे सीरिजमध्ये क्लीन स्वीप केला होता.
सामन्याबद्दल थोडक्यात
टीम इंडियाने निर्धारित 50 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 385 धावा करत न्यूझीलंडला विजयासाठी 386 धावांचं आव्हान दिलं. टीम इंडियाकडून शुबमन गिल आणि कॅप्टन रोहित शर्मा या सलामी जोडीने 112 आणि 101 धावांची शती खेळी केली.
न्यूझीलंड मैदानात आली. किवींनी विजयासाठी 386 धावांचे लक्ष्य होतं. पण टीम इंडियाच्या गोलंदाजांनी न्यूझीलंडला 41.2 ओव्हरमध्ये 295 धावांवरत ऑलआऊट केलं.
न्यूझीलंडकडून डेव्हॉन कॉनवेने सर्वाधिक 138 धावांची खेळी केली. तर हेनरी निकोलसने 42 रन्स केल्या. या दोघांव्यतिरिक्त भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांना मैदानात फार टिकू दिलं नाही.
टीम इंडियाकडून शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादव या दोघांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. युझवेंद्र चहलने 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर हार्दिक पांड्या आणि उमरान मलिक या दोघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, वॉशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल आणि उमरान मलिक.
न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन : फिन एलन, डेवन कॉनवे, हेनरी निकल्स, डॅरेल मिचेल, टॉम लॅथम, ग्लेन फिलिप्स, मायकल ब्रेसवेल, मिचेल सँटनर, जॅकब डफी, ब्लेयर टकनर आणि लॉकी फर्ग्यूसन.

Go to Source

Show More

Related Articles

Back to top button
DMCA.com Protection Status