
VIDEO : रोहित शर्माचा एकहाती अफलातून कॅच, व्हीडिओ व्हायरल
इंदूर : टीम इंडियाने न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या वनडेतही विजयी घोडदौड सुरु ठेवली. टीम इंडियाने तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडवर 90 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाने ही मालिका 3-0 च्या फरकाने जिंकली. यासह टीम इंडिया वनडे रँकिंगमध्ये नंबर 1 ठरली. या सामन्यात कॅप्टन रोहित शर्मा याने धमाका केला. रोहितने वनडेत 3 वर्षांनी शतक ठोकलं. तसेच शानदार फिल्डिंगही केली.
कॅप्टन रोहितने टॉस गमावला. मात्र बॅटिंग आल्यानंतर रोहितने चौफेर फटकेबाजी केली. रोहितने शुबमनसबत 212 धावांची सलामी भागीदारी केली. रोहितने 101 धावांची शतकी खेळी केली. तर गिलनेही 112 धावा ठोकल्या.
रोहितचा अफलातून कॅच
न्यूझीलंडचा पराभव नक्की झाला होता. अशातच रोहितने बॅटिंगनंतर फिल्डिंगमध्ये आपली हुशारी दाखवली. रोहितने एका हाताने शानदार कॅच घेतला.
कुलदीप यादव न्यूझीलंडच्या डावातील 39 वी ओव्हर टाकत होता. ओव्हरमधील पाचवा बॉल लॉकी फॅर्ग्यूसनने सावकाश खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र बॉल बॅटच्या वरच्या कडेला लागला आणि हवेत गेला. रोहित शॉर्ट मिडविकेटवर उभा होता. बॉल रोहितच्या डोक्यावरुन जात होता. मात्र रोहितने उलट धावत एकाहाताने शानदार कॅच घेतला.
रोहितचा एकहाती कॅच
One handed stunner catch by Captain Rohit Sharma. pic.twitter.com/7ZC820ySo3
— Immy|| (@TotallyImro45) January 24, 2023
रोहितला कॅच घेतल्यानंतर स्वत:ला खरं वाटत नव्हतं. रोहित हसू लागला. सोबत सूर्यकुमार यादवही हसू लागला. अशाप्रकारे न्यूझीलंडने आठवी विकेट गमावली. फर्ग्यूसन 7 रन्स करुन माघारी परतला. टीम इंडियाने न्यूझीलंडला विजयासाठी 385 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र न्यूझीलंडचा डाव 295 धावांवर 41.2 ओव्हर्समध्येच आटोपला.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, वॉशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल आणि उमरान मलिक.
न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन : फिन एलन, डेवन कॉनवे, हेनरी निकल्स, डॅरेल मिचेल, टॉम लॅथम, ग्लेन फिलिप्स, मायकल ब्रेसवेल, मिचेल सँटनर, जॅकब डफी, ब्लेयर टकनर आणि लॉकी फर्ग्यूसन.