
INDvsNZ, 3rd ODI : कुलदीप-शार्दूलची कमाल, टीम इंडियाचा न्यूझीलंडवर 90 धावांनी शानदार विजय
इंदूर : टीम इंडियाने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडवर 90 धावांनी शानदार विजय मिळवला आहे. न्यूझीलंडला विजयासाठी 386 धावांचे आव्हान मिळाले होते. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी न्यूझीलंडला 41.2 ओव्हरमध्ये 295 धावांवरत ऑलआऊट केलं. न्यूझीलंडकडून डेव्हॉन कॉनवेने सर्वाधिक 138 धावांची खेळी केली. तर हेनरी निकोलसने 42 रन्स केल्या. या दोघांव्यतिरिक्त भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांना मैदानात फार टिकू दिलं नाही.
टीम इंडियाकडून शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादव या दोघांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. युझवेंद्र चहलने 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर हार्दिक पांड्या आणि उमरान मलिक या दोघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, वॉशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल आणि उमरान मलिक.
न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन : फिन एलन, डेवन कॉनवे, हेनरी निकल्स, डॅरेल मिचेल, टॉम लॅथम, ग्लेन फिलिप्स, मायकल ब्रेसवेल, मिचेल सँटनर, जॅकब डफी, ब्लेयर टकनर आणि लॉकी फर्ग्यूसन.