मलकापूर ग्रामीण हद्दीत मायनिंग ब्लास्ट करून विहीर खोदकाम : विना परवाना , परवानगी : भारत लाईव्ह न्यूज मीडिया !
पोलीस यंत्रणेच्या काही अधिकार्यांची वरदहस्त : ग्राउंड रिपोर्ट


बुलढाणा : जिल्हा प्रतिनिधी ( नवील वाघ ) , मलकापूर येथील ग्रामीण हद्दीत येणाऱ्या लोनवडी गावा शेजारी राजू कल्याणकर ह्यांच्या मालकीचे विना वैध वाहतूक परवाना , पासिंग नंबर नसलेल्या ब्लास्टिंग ट्रॅक्टर द्वारे चक्क कोल मायनिंग साठी वापरात येणाऱ्या भारी ब्लास्टिंग डेटोनेटर सामुग्री वापरून अवैध रित्या खोदकाम सुरु असून. कुठल्याही योग्य शासकीय परवाना , परवानगी नसतांना निर्धास्त पणे सुरु असलेल्या ब्लास्टिंग ची खबर मिळताच. भारत लाईव्ह न्यूज मीडिया च्या शोध पत्रकारांनी ब्लास्टिंग ठिकाणी जाऊन बातमीची शहानिशा केल्यावर काही धक्का दायक सत्ये बाहेर आली आहेत.
सदर , ब्लास्टिंग काम करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाच्या सांगण्यानुसार ब्लास्टिंग कामात घेण्यात आलेल्या ट्रॅक्टर वर पासिंग नंबर का नाही विचारल्यावर उडवा उडवीची उत्तरे देत. राजू कल्याणकर नामक ब्लास्टिंग मालकाला फोन लावून दिला. संबंधितांनी त्या ठिकाणी कुठलेच कागद पत्रे का नाही ? शेतात ह्या प्रकारे ह्या उच्चं क्षमतेच्या ब्लास्टिंग साहित्य कसे वापरत आहेत ? मजुरी करणाऱ्यांना कुठलीच सुरक्षित उपाययोजना तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणावर असलेल्या ब्लास्टिंग डेटोनेटर ब्लास्टिंग रॉड्स कशी हाताळायची ? वाहतूक करायची ? परवानगी आहे का ? तालुका तहसीलदार ह्यांचे कडे आपण अर्ज केला आहे का ? स्थानिक पोलीस यंत्रणेला आपण परवानगी साठी अर्ज केलात का ? त्याची परवानगी कुठे आहे ? ड्रॉयव्हर जवळ वाहनाचे कुठलेच कागदपत्र का नाहीत ? कुठल्याही अपघात घडून कुणी मृत्यू मुखी पडल्यास जबाबदारी कुणाची ? कुठलीच सुरक्षिततेची उपाय योजना न वापरता आपण येथे ब्लास्टिंग करीत आहेत. येथे अनावधानाने एखाद्या मजुराची प्राण हानी किव्हा कायमचे अपंगत्व आल्यास आपण जबाबदारी घेणार का ? गौण खनिज आपण विहिरीतून काढून पुढे कुठे वापरत आहेत ? महसूल विभागाला ह्याची माहिती आहे का ? एवढ्या मोठ्या प्रतीचे डायनामाईट डेटोनेटर जे केवळ कोल मायनिंग खाणी मध्ये मोठ्या कामी वापरात येतात ते आपल्या कडे कसे आले ? त्या बदल आपल्या कडे परवाना आहे का ? वाहतूक साठवण करण्याचा परवाना आहे का ? अभियंत्यांनी येथे प्री मायनिंग केल्याचा अहवाल तसेच परवानगी आहे का ? पर्यावरण विभागाची परवानगी आहे का ? स्थानिक पोलीस प्रशासनाची कागदोपत्री ना हरकत परवानगी आहे का ? ट्रॅक्टर मालकाने सदर प्रश्नाची कुठलीच योग्य उत्तरे देऊ केली नाहीत. तसेच आम्ही नियमित पणे सर्वांना हफ्ते देत असल्यामुळे आम्हाला परवानगी ची गरज नाही. तसेच ग्रामीण पोलीस स्टेशन ला कार्यरत असलेल्या एक कर्मचाऱ्यांची नावा निशी उघड पणे हे तुम्हाला उत्तरे देतील म्हणत साडे लोटे करण्याचा प्रयत्न केला आहे. संबंधित पोलीस स्टेशन निरीक्षकांना सदर घटने कामी संपर्क केल्या असता संपर्क होऊ शकला नाही.
भारतीय दंड विधान अंतर्गत सदर कामासाठी परवाना धारक ह्यांना सुद्धा आपण खोद काम करणार असल्याची परवानगी घेणे आवश्यक असल्याचे प्रावधान आहे. त्या पश्चात विना नम्बर चे भारी वाहतूक वाहन फिरविणे दंडनीय अपराध आहे. एक्सप्लोजीव ऍक्ट १८८४ , १९९८ आणि २००८ नुसार विविध पोट कलमं खाली अनेक गुन्हे दाखल होऊन. सदर अवैध ब्लास्टिंग सामान साहित्य कुठून आले त्याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. कुठल्या पोलीस कर्मचाऱ्याचा इशाऱयांवर सदर ब्लास्टिंग चा वापर करण्यात आला त्यांची तात्काळ डिपार्टमेंटल चौकशी तसेच कार्यवाही होणे अपेक्षित आहे. तालुका तहसीलदार ह्यांचे मार्फत सदर ब्लास्टिंग कर्त्यावर दंडात्मक कार्यवाही होणे अपेक्षित आहे. गौण खनिज ह्या प्रकारे उत्खनन करून सर्रास पणे मोठ्या प्रतीच्या ब्लास्टिंग चा उपयोग अत्यंत गंभीर असून. कुठल्याही अन्य गुन्हेगारी प्रवृत्ती मध्ये देखील अश्या प्रकारे विना नंबर चे वाहने तसेच ब्लास्टिंग घडवून आणने हि अश्या अवैध धंदे धारकांना कठीण नाही. कुठल्याच शासकीय कार्यवाहीची भीती तसेच तमा न बाळगता ह्या प्रकारच्या धंदे कर्त्यां मध्ये प्रशासनाची तसेच पोलीस यंत्रणेची काही भीती शिल्लक नसल्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे.
सदर घटनेच्या पुढच्या कार्यवाही साठी वन विभाग , पर्यावरण विभाग , जिल्हाधिकारी , आरटीओ विभाग , बीडीडीएस , स्थानिक गुन्हे शाखे , पोलीस अधीक्षक ह्यांचे कडे पाठपुरावा करण्याची तैयारी आहे. जेणे करून असल्या प्रकाराच्या घटनांची पुर्णरावृत्ती नाही होणार. पुढील होणाऱ्या सर्व कार्यवाही कडे प्रसार माध्यमांचे लक्ष लागून. बयूरो रिपोर्ट भारत लाईव्ह न्यूज मीडिया !