ह्रता दुर्गुळे- प्रतीक शाह अडकले लग्न बंधनात, सुंदर फोटो बघा

ह्रता दुर्गुळे- प्रतीक शाह अडकले लग्न बंधनात, सुंदर फोटो बघा

मुंबई : मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि प्रतीक शाह मुंबईत विवाहबंधनात अडकले. ई-टाइम्सने ही माहिती दिली आहे.

मुंबई : मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि प्रतीक शाह मुंबईत विवाहबंधनात अडकले. ई-टाइम्सने ही माहिती दिली आहे. 

 

या लग्नाला कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते. मात्र या दोन्ही बाजूंकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या दोघांच्या लग्नाचा पहिला फोटो समोर आला आहे. चाहत्यांकडू या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

 

ई-टाइम्सच्या वृत्तानुसार लग्नात दोघांचा पारंपारिक लूक होता. दोघांच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी चाहते आतुर झाले असले तरी दोघांच्या बाजूने अजून कोणतीही घोषणा केली गेली नाही.

 

ह्रता दुर्गुळेने बॉयफ्रेंड प्रतीक शाह याच्याशी शुक्रवारी, 24 डिसेंबर 2021 रोजी साखरपुडा केला होता. हृता दुर्गुळेने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण रिलेशनशिपमध्ये असल्याची घोषणा केली होती. छोट्या पडद्यावरील ‘फुलपाखरू’ आणि ‘मन उडू उडू झालं’ मालिकांमधून हृता दुर्गुळे घराघरात लोकप्रिय झाली आहे. 

 

प्रतिक हा हिंदी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री मुग्धा शाहचा मुलगा आहे. त्यांनी अनेक लोकप्रिय हिंदी मालिका दिग्दर्शित केल्या आहेत. प्रतीकने ‘तेरी मेरी इक जिंदादी’, ‘बेहद 2’, ‘बहू बेगम’, ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’, ‘एक दीवाना था’ यांसारख्या मालिका दिग्दर्शित केल्या आहेत.

Go to Source

Related Articles

Back to top button
DMCA.com Protection Status