आजचं राशीभविष्य, सोमवार, १३ जून २०२२

आजचं राशीभविष्य, सोमवार, १३ जून २०२२

आजचं राशिभविष्यानुसार सिंह राशीच्या व्यक्तींना छुप्या शत्रूंचा त्रास संभवतो. हातातील लाभाबाबत गाफिल राहू नका.

मेष:-

मानसिक द्विधावस्था जाणवेल. अती विचारात वेळ वाया जाईल. कौटुंबिक गोष्टीला अधिक प्राधान्य द्या. सामुदायिक वादापासून दूर रहा. कामात काहीशी प्रतिकूलता जाणवेल.

वृषभ:-

मित्रमंडळींशी वाद संभवतात. अधिकारी वर्गाचा पगडा राहील. कष्ट अधिक व वेळ कमी अशी स्थिती राहील. मौल्यवान वस्तूंचा लाभ होईल. कौटुंबिक प्रश्नांबाबत चिंता वाटेल.

मिथुन:-

मानसिक स्थैर्यासाठी ध्यानधारणा करा. पैशाचा अपव्यय टाळा. मोहाला बळी पडू नका. अती अपेक्षा बाळगून चालणार नाही. कर्जाचे व्यवहार तूर्तास टाळावेत.

कर्क:-

भावनेच्या आहारी जाऊ नका. मनात नसत्या कल्पना रंगवत बसू नका. कौटुंबिक खर्च वाढू शकतो. हट्टीपणाने वागून चालणार नाही. मानापमानाचे प्रसंग येऊ शकतात.

सिंह:-

छुप्या शत्रूंचा त्रास संभवतो. हातातील लाभाबाबत गाफिल राहू नका. योग्य संधीसाठी वाट पहावी लागेल. पायाचे विकार बळावू शकतात. किरकोळ जखमांकडे वेळीच लक्ष द्या.

कन्या:-

काही गोष्टी जुळवून घ्यावा लागतील. उगाच विरोधाला विरोध करत बसू नका. अधिकाराचा योग्य वापर करा. वेळेचे योग्य नियोजन करावे. रागावर नियंत्रण ठेवा.

तूळ:-

उष्णतेच्या तक्रारी जाणवू शकतात. तिखट व तामसी पदार्थ खाण्याची इच्छा होईल. कमी श्रमातील कामाकडे लक्ष द्याल. अचानक धनलाभाची शक्यता. भांडकुदळ  व्यक्तींपासून दूर रहा.

वृश्चिक:-

वैवाहिक सौख्यात भर पडेल. मुलांचे स्वतंत्र विचार समजून घ्यावेत. कसरत करण्याकडे अधिक कल राहील. संपर्कातील लोकांशी मैत्री वाढेल. मानसिक अशांततेच्या आहारी जाऊ नका.

धनू:-

कौटुंबिक गोष्टी प्राधान्याने सोडवा. दुचाकी वाहन चालवताना अधिक काळजी घ्यावी. संघर्षमय वातावरणाचा ताण कमी करा. जमिनीच्या कामातून लाभ होईल. मनात शंकेला थारा देऊ नका.

मकर:-

सारासार विचार करून निर्णय घ्या. स्वमतावर आग्रही राहाल. प्रतिकूलतेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा. संघर्षमय स्थिती निवळण्याचा प्रयत्न करा. इतरांवर फार विसंबून राहू नका.

कुंभ:-

अती उदारपणा दाखवणे योग्य नाही. बोलताना शब्दांचे वजन लक्षात घ्या. स्वभावात काहीसा लहरीपणा येईल. दिवसभर काही न काही खटपट करत रहा. मनाजोगी खरेदी करता येईल.

मीन:-

उद्दिष्ट साध्य करण्यासाठी झटाल. वाहन वेगावर नियंत्रण ठेवा. नवीन उर्जेने कामे हाती घ्या. स्वतंत्र विचार करण्यावर अधिक भर द्या. कौटुंबिक प्रश्न प्राधान्याने हाताळा.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Go to Source

Show More

Related Articles

Back to top button
DMCA.com Protection Status