आजचं राशीभविष्य, मंगळवार, ७ जून २०२२

आजचं राशीभविष्य, मंगळवार, ७ जून २०२२

आजचं राशिभविष्यानुसार कुंभ राशीच्या व्यक्तींचे व्यावसायिक ठिकाणी कामाचे कौतुक होईल. उत्तम वाहन सौख्य लाभेल.

मेष:-

कामानिमित्त संपर्कात वाढ होईल. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या. वडीलधार्‍यांचा सल्ला विचारात घ्यावा. आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न कराल. मित्रांशी वाद वाढवू नका.

वृषभ:-

सर्व बाबतीत आनंद मानाल. व्यावसायिक आघाडीवर महत्त्वाची कामे कराल. नोकरदारांची जबाबदारी वाढेल. आर्थिक मान सुधारेल. मानसिक अस्वस्थता वाढवू नका.

मिथुन:-

हाती घेतलेल्या कामात पूर्तता येईल. कामाचा फार ताण घेऊ नका. बोलतांना वाणीवर संयम ठेवावा लागेल. वरिष्ठ नाराज होणार नाहीत याची काळजी घ्या. मनातील इच्छा पूर्ण होईल.

कर्क:-

फसवणुकीपासून सावध राहावे. व्यवसायिकांना चांगला आर्थिक लाभ होईल. कौटुंबिक खर्च अचानक वाढू शकतो. बौद्धिक चर्चेत सहभागी होऊ नका. मनातील निराशा दूर सारावी.

सिंह:-

प्रत्येक कृती संयमाने करावी. वादापासून चार हात दूर राहावे. घरातील ज्येष्ठाशी मतभेद संभवतात. कागदपत्रांवर सही करतांना दक्षता बाळगा. लबाड लोकांपासून वेळीच दूर रहा.

कन्या:-

अचानक धनलाभाची शक्यता. परोपकाराच्या जाणि‍वेतून कामे कराल. पोटाच्या तक्रारी राहतील. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. जास्त संवेदनशील होऊ नका.

तूळ:-

द्विधा मन:स्थितीमुळे निर्णय घेताना कठीण होईल. काही महत्त्वाची कामे पार पडतील. व्यवहारात फार हटवादीपणा करू नका. क्रोधामुळे वाद वाढू शकतात. दिवसभरात चांगली आर्थिक कमाई होईल.

वृश्चिक:-

मानसिक प्रसन्नता लाभेल. घरातील वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न कराल. जवळच्या ठिकाणच्या सहलीचे आयोजन कराल. जोडीदाराला खुश ठेवण्याचा प्रयत्न करावा. कौटुंबिक शांतता जपावी.

धनू:-

प्रत्येक कृती संयमाने करावी. मानसिक चिंता दूर साराव्यात. मुलांचा खोडकरपणा वाढीस लागेल. जोडीदाराविषयी गैरसमज संभवतात. प्रवास जपून करावा.

मकर:-

जवळच्या मित्रांशी भेट होईल. कामे मनाजोगी पार पडतील. बोलताना शब्दांचे वजन लक्षात घ्या. प्रेमप्रकरणात नवीन आशा पल्लवीत होईल. अचानक धनलाभाची शक्यता.

कुंभ:-

व्यावसायिक ठिकाणी कामाचे कौतुक होईल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. मुलांशी क्षुल्लक कारणांवरून मतभेद संभवतात. जवळच्या ठिकाणी सहलीचा आनंद घ्याल. मित्र-मैत्रिणींचा गोतावळा जमा कराल.

मीन:-

वरिष्ठांशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न करा. मानसिक चिंता बाजूला साराव्यात. कौटुंबिक वातावरण तुमच्या आवडीचे राहील. वादाच्या मुद्यांपासून दूर राहावे. शारीरिक कंटाळा झटकून टाकावा.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Go to Source

Related Articles

Back to top button
DMCA.com Protection Status