आजचं राशीभविष्य, गुरुवार, २ जून २०२२

आजचं राशीभविष्य, गुरुवार, २ जून २०२२

आजचं राशिभविष्यानुसार कन्या राशीच्या व्यक्तींनी हाताखालील लोकांकडे बारीक लक्ष द्यावे. कामाचा ताण अधिक जाणवेल.

मेष:-

थोडेसे मनाविरुद्ध वागावे लागू शकते. मानापमानाच्या प्रसंगातून जावे लागू शकते. कामात मोठे बदल करण्याचा विचार करू नये. जवळच्या मित्रांशी दुरावा वाढू शकतो. कौटुंबिक खर्च वाढू शकतो.

वृषभ:-

कामात काही अनपेक्षित बदल घडून येतील. घरातील गोष्टींमध्ये विशेष लक्ष घाला. मनाविरुद्ध प्रवास करावा लागू शकतो. सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल. कामातील अडचणी दूर कराव्या लागतील.

मिथुन:-

नियोजनबद्ध कामे करावीत. कष्टाला मागेपुढे पाहू नका. वडीलधार्‍या व्यक्ति तुमच्यावर नाराज होऊ शकतात. प्रवासात मनस्ताप वाढू शकतो. नियमांचे काटेकोरपणे पालन कराल.

कर्क:-

किरकोळ दुखापत संभवते. जोडीदाराचा स्वभाव अचंबित करेल. थोरांचे वेळेवर मार्गदर्शन घ्यावे. आपल्या इच्छेला अधिक महत्त्व द्याल. घराबाहेर वावरतांना सतर्क राहावे.

सिंह:-

प्रिय व्यक्तीशी दुरावा वाढू शकतो. भागीदाराशी समजुतीने घ्यावे. अपचनाचा त्रास संभवतो. डोळ्यांची वेळेवर तपासणी करावी. गृहसौख्याकडे विशेष लक्ष द्यावे.

कन्या:-

हाताखालील लोकांकडे बारीक लक्ष द्यावे. कामाचा ताण अधिक जाणवेल. वरिष्ठांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करावा. व्यावसायिक वृद्धीचा लाभ उठवावा. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल.

तूळ:-

प्रेमप्रकरणाला वेगळी कलाटणी लागू शकते. रेस जुगारातून नुकसान संभवते. चोरांपासून सावध राहावे. मानसिक ताण काहीसा वाढू शकतो. मुलांच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे.

वृश्चिक:-

जवळच्या मित्रांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. कौटुंबिक अडचणीवर मात करता येईल. उष्णतेचा विकार बळावू शकतो. पित्त प्रकृती असणार्‍यांनी विशेष काळजी घ्यावी. नातेवाईक तुमच्यावर नाराज होऊ शकतात.

धनू:-

जवळचा प्रवास टाळलेलाच बरा. भावंडांशी मतभेदाचे प्रसंग उद्भवतील. नसते साहस महागात पडू शकते. कौटुंबिक खर्चाला आळा घालावा लागेल. भागीदारीच्या व्यवसायात नवीन ओळखी होतील.

मकर:-

स्वत:त काही जाणीवपूर्वक बदल करावे लागतील. अचानक काही खर्च सामोरे येतील. जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल. बोलताना शब्दांचे भान ठेवावे. मत्सराला बळी पडू नका.

कुंभ:-

उगाच कोणाशीही शत्रुत्व पत्करू नका. अपचनाचा त्रास वाढू शकतो. कापणे, भाजणे यांसारखे किरकोळ त्रास संभवतात. परिस्थितीला नांवे ठेवू नका. शांतता व संयम बाळगावा.

मीन:-

मानसिक शांततेसाठी ध्यानधारणा करावी. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक केले जाईल. धैर्याने नवीन कामाला सामोरे जा. जोडीदाराच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळा.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Go to Source

Show More

Related Articles

Back to top button