ऑनर किलिंग : शुभांगी जोगदंड ची हत्या करून जाळून टाकले ! नांदेड येथील घटना : भारत लाईव्ह न्यूज मीडिया !


मुंबई : धनवीरसिंग ठाकूर , सामाजिक प्रतिमा आपल्या पोटच्या अपत्यां पेक्षा जास्त आहे का ? ज्या मुलांना आपण राख सांभाळ केली , हात बोट पकडून चालणे बोलणे शिकविले. अंगा खांद्यावर बसवून सगळे लाड पुरविले. एक दिवशी फक्त सामाजिक प्रतिमा जपण्याच्या नादात निर्घृण खून करून जाळून टाकायचं ? कितपत योग्य वाटते !. फक्त खून करणे आणि मृतदेहाची जाळून राख करून टाकल्याने सामाजिक प्रतिमा राहील का ? हा लाख मोलाचा विचार त्या सर्व परिवार वाल्यानी केला पाहिजे होता. एक भविष्यातील डॉकटर तरुणी एवढ्या गंभीर अंताला कशी प्राप्त झाली बघूया ….
नांदेड, २३ वर्षीय शुभांगी जोगदंड … देखणी हुशार आणि वैद्यकीय शिक्षण घेत होती. नांदेड येथील आयुर्वेदिक महाविद्यालयात बीएएमएसमध्ये तिसऱ्या वर्षात शिकत होती. गावातील ओळखीच्या तरुण सोबत तिची ओळख परिचय होता. ज्याचं पुढे प्रेमात रूपांतर झाले. परंतु शुभांगी च्या घरच्यांना हे मान्य नव्हते ! त्यांनी तिची योग्य रित्या समजूत घालायची गरज होती. परंतु , अजानतेमध्ये त्यांनी तिच्या भावनांचा विचार न करता तिला पूर्ण पणे डिवचून वेगळेच वळण दिले.
काही दिवसांनी शुभांगी च्या घरच्यांनी तीच स्थळ कुठे तरी नक्की करून सोयरीक करून टाकली. येथेही तिला विश्वासात घेऊन मार्मिक रित्या हि बाब हाताळली गेली पाहिजे होती. येथे हि त्यांनी पुन्हा चुकीचे वागणूक केली.
तिच्या प्रियकरा मार्फत होणाऱ्या नवऱ्या मुलाला त्या दोघांचे प्रेम असल्याचे सांगून फोटो पुरावे दाखवून लग्न मोडण्यास कारण झालं.
त्याचीच प्रचंड मनात राग धरून शुभांगी हिच्या घरच्यांनी समाजात आमची बदनामी झाली ? वगैरे वगैरे समजून तिचा निर्घृण खून केला आणि स्वतःच्या शेतात नेवून तो मृतदेह जाळून टाकला. आणि लगेच त्या शेत मध्ये दुसऱ्या पिकाची लागवड प्रक्रिया हि सुरु केली.
मनाला सुन्न करणारी हि घटना आहे.
शुभांगी तीन दिवसांपासून बेपत्ता असून, ती नातेवाईकांकडेही नाही याची चर्चा महिपाल पिंपरी गावात सुरू होती. गावातील काही नागरिकांनी गुरुवारी 26 जानेवारीला लिंबगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार चंद्रकांत पवार यांना माहिती दिली. त्यांनी गोपनीय पद्धतीने चौकशी केली असता, शुभांगीच्या आई- वडिलांनी मामा, काका व काकाच्या दोन मुलांच्या मदतीने शुभांगीचा खुन करून पुरावा नष्ट केल्याची बाब समोर आली आहे.
याप्रकरणी लिंबगाव पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल असून, खुनातील दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या खुनामध्ये एकूण पाच आरोपी असून, अन्य तिघांचा शोध सुरू असल्याचे ठाणेदार चंद्रकांत पवार यांनी सांगितलं आहे.
नांदेडचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी माध्यमांना याविषयी माहिती देताना सांगितलं की, “पिंपरी महिपाल गावाची 22 वर्षीय तरुणी जी बीएएमस शिकत होती, तिला घरच्याच लोकांनी मारल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. 26 तारखेला ही माहिती देणारा फोन पोलिसांना आला होता. त्यानंतर पोलीस गावात पोहोचले आणि मुलीच्या नातेवाईकांशी चर्चा केली.
“पोलिसांच्या चौकशीत त्यांनी कबूल केलं की, मुलीचं एका तरुणासोबत अफेयर होतं. यामुळे तिचं लग्न तुटलं होतं. यामुळे त्यांची बदनामी झाली आहे. त्यामुळे त्यांनी तिचा गळा दाबून खून केला. मग अंत्यसंस्कार करून तिची राख नदीत फेकून दिली. तरुणीच्या कुटुंबीयांनी हे कबूल केलं आहे.”
“ज्या ज्या ठिकाणी राख मिळाली आहे, ती ठिकाणं पोलिसांनी पाहिली आहेत. नदीत काही सामानही मिळालं आहे. ते तपासणीसाठी फॉरेन्सिकला पाठवला आहे. याप्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढची चौकशी सुरू आहे,” असंही कोकाटे यांनी सांगितलं.