गुन्हेगारीपब्लिक से बोल आज विशेष !बातम्यामहत्वाची बातमीमुद्दा गंभीर आहे !संपादकीय

शेतकरी हा राजा तो कागदावरच अस्तित्वात त्याला न्याय सुद्धा नाही ! लाजिरवाणी शासकीय न्याय व्यवस्था : भारत लाईव्ह न्यूज मीडिया !

कागदाचा राजा शेतकरी ...!

मुंबई : धनवीरसिंग ठाकूर , जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील सुनील गुज्जर नामक शेतकरी ह्याचे जवळपास ४ कोटी इतकी आर्थिक फसवणूक करवून. धान्य व्यापाऱ्यांनी शासन कर्त्यांना भरगोस पाकिटे पोहोचविल्या मुळे आज पर्यंत न्यायाला वंचित आहे. सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे ,

कोरोना काळ दरम्यान सुनील गुज्जर राहणार नेरी जामनेर तालुका जिल्हा जळगाव ह्यांनी आपली तसेच इतर शेतकरी ह्यांचे मिळून तब्बल ४ कोटी रुपयांची रकमेची शेतकरी धान्य माल हा जामनेर येथील महावीर एग्री मार्केट खाजगी येथे ठेवला होता. ज्याचे संचालक अतुल कोठारी , ईश्वरलाल कोठारी हे आहेत. त्यांनी त्या शेतकरी मालाची योग्य कल्पना न देता आपल्या वयक्तिक आर्थिक हेतू साधून लालचेने तो शेतकरी धान्यमाल विक्री केला आणि रक्कम गपचिप हडपून टाकली. जेव्हा कोरोना नियमावली शिथिल झाली आणि शेतकरी सुनील गुज्जर ह्यांनी जामनेर येथील खाजगी शेतकरी बाजारपेठ महावीर एग्रो मार्केट येथे जाऊन संचालक ह्यांना आपल्या धान्याबद्दल विचारपूस केले असता. तू कुठलाच माल आम्हाला दिला नाही किव्हा ठेवला नाही ? तसेच आम्ही तुला तुझे पेमेंट केले आहे असे सांगून आर्थिक रित्या जबरी लूट त्या शेतकरी सुनील गुज्जर ह्याच्यावर केली.

शेतकरी हा राजा तो कागदावरच अस्तित्वात त्याला न्याय सुद्धा नाही ! लाजिरवाणी शासकीय न्याय व्यवस्था : भारत लाईव्ह न्यूज मीडिया !
शेतकरी हा राजा तो कागदावरच अस्तित्वात त्याला न्याय सुद्धा नाही ! लाजिरवाणी शासकीय न्याय व्यवस्था : भारत लाईव्ह न्यूज मीडिया !

सुनील गुज्जर ह्यांनी ताबडतोब आपल्याला न्यायिक दाद मिळावी म्हणून पोलीस यंत्रणा , जळगाव जिल्हा जिल्हाधिकारी , दंडाधिकारी ह्यांची वेळोवेळी प्रत्येक रित्या पाठपुरावा केला तरीही त्यांना न्याय मिळालाच नाही. उलट त्यांचेवर गंभीर प्रत्यारोप आणि खोटे गुन्हे दाखल करून त्यांची आर्थिक , मासिक आणि शारीरिक छळ करण्यात आला.

कुठलाही न्यायिक विभाग ह्या साध्या सरळ गंभीर गुन्ह्याला तपास करून शेतकऱ्याला न्याय देण्यात का निष्पळ ठरत आहेत ? येथे सामान्य माणसाला काहीही किंमत उरली नाही का ? भारतीय संविधानातील न्याय मूलभूत हक्क फक्त लिहिलेली बाब आहे का तिचे योग्य मूल्य कुणीही सत्यात अवतरित करण्यास उपयुक्त नसल्याचे जिवंत उदाहरण आपल्या समोर आहे. ह्या पीडित शेतकऱ्याने आज पर्यंत ३ वेळा आपला देह जाळून घेण्याचा प्रयत्न केला आहे तरी सुद्धा ह्या बहिऱ्या शासकीय न्याय व्यवस्थे पर्यंत शेतकऱ्याचा आवाज पोहोचत का नाही ? महाराष्ट्र शासन एवढे निष्ठुर आहे का ? खरंच शेतकऱ्याची आपण किती किंमत करत आहेत हे दाखविण्याची हि योग्य वेळ आज उपस्थित झाली आहे. पुढील कार्यवाही साठी आम्ही प्रसार माध्यमे नक्कीच आमच्या वतीने ह्या शेतकरी कुटुंबाला हक्काचा न्याय मिळेल त्यासाठी सर्व पाठ पुरावे करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. सोबतच प्रशासन आपल्या पाल्य सोबत घडणाऱ्या ह्या अवचित प्रकाराला कसे हाताळेल ह्या कडेही लक्ष ठेवून बयूरो रिपोर्ट भारत लाईव्ह न्यूज मीडिया !

Related Articles

Leave a Reply

Back to top button
DMCA.com Protection Status