Ganga Dashara 2022: गंगा दसर्‍याला गंगेत स्नान केल्याने धुतले जातात 10 प्रकारची पापे, जाणून घ्या तारीख आणि मुहूर्त

Ganga Dashara 2022: गंगा दसर्‍याला गंगेत स्नान केल्याने धुतले जातात 10 प्रकारची पापे, जाणून घ्या तारीख आणि मुहूर्त

ज्येष्ठ शुक्ल दशमीला देभरात गंगादशहरा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी गंगेची पूजा केली जाते. माता गंगा अवतरण्याचा दिवस गंगा दसरा म्हणून ओळखला जातो. ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षाच्या दहाव्या तिथीला माता गंगेचा अवतरण दिवस साजरा केला जातो. यंदा 9 जून …

ज्येष्ठ शुक्ल दशमीला देभरात गंगादशहरा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी गंगेची पूजा केली जाते. माता गंगा अवतरण्याचा दिवस गंगा दसरा म्हणून ओळखला जातो. ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षाच्या दहाव्या तिथीला माता गंगेचा अवतरण दिवस साजरा केला जातो. यंदा 9 जून 2022 रोजी गंगा दसरा साजरा केला जाणार आहे. 

 

पापमुक्तदायिनी माता गंगेच्या स्वर्गातून पृथ्वीपर्यंतच्या प्रवासाचे कथेचे वर्णन विविध हिंदू धार्मिक ग्रंथांमध्ये आढळते. असे म्हणतात की माता गंगेचा वेग आणि प्रवाह ऐकून मार्कंडेय ऋषींचे तप भंग झाले होते. म्हणून मार्कंडेय ऋषींनी माता गंगा आत्मसात केली. पुढे लोककल्याणाच्या भावनेने ऋषींनी उजव्या पायाचे बोट पृथ्वीवर दाबून माता गंगेला मुक्त केले.

 

गंगेत स्नान करण्याचा शुभ मुहूर्त

ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षातील दशमी तिथी 9 जून रोजी सकाळी 8.21 मिनिटापासून पासून सुरू होईल आणि 10 जून रोजी सकाळी 7.25 मिनिटापर्यंत राहील. शुक्ल पक्षातील दशमी तिथी हस्त नक्षत्रात येत असून या दिवशी व्यतिपात योगही आहे.

 

गंगेत स्नानाचे महत्व

दसऱ्याच्या सणात 10 अंकाला खूप महत्त्व आहे. सर्व पापांचा नाश करणाऱ्या गंगेत स्नान केल्याने मनुष्याची सर्व पापे धुऊन जातात. दसर्‍याच्या दिवशी गंगेत 10 डुबकी मारावीत असा समज आहे. दसरा म्हणजे 10 वृत्तींचे उच्चाटन. मोक्षदायिनी मां गंगेत स्नान केल्याने 10 प्रकारची पापे धुऊन जातात. यात तीन दैहिक पापे, चार वाणीद्वारे घडलेली पापे चार मानसिकरित्या केली गेली पापे सामील आहेत.

Go to Source

Related Articles

Back to top button
DMCA.com Protection Status