बातम्यामहत्वाची बातमीमाहिती विभागराजकारण
Trending

जनसामान्यांत खाऊ जेवण वाटून प्रहार जनशक्ती पक्षाचा वर्धापन दिन उत्साहात पार पडला !

जनसामान्यांत खाऊ जेवण वाटून प्रहार जनशक्ती पक्षाचा वर्धापन दिन उत्साहात पार पडला !
जनसामान्यांत खाऊ जेवण वाटून प्रहार जनशक्ती पक्षाचा वर्धापन दिन उत्साहात पार पडला !

 

 

मलकापूर:- मलकापूर येथे प्रहार जनशक्ती पक्ष वर्धापन दिना निमित्त उपजिल्हा प्रमुख श्री.अजय टप यांच्या उपस्थिती मध्ये मलकापूर शहरातील रेल्वे स्टेशन परिसर,बुलडाणा रोडवरील बेघर गरीब गरजूंना खिचडी,लाडू वाटप करीत तसेच तहसिल चौक येथे प्रहार कार्यकर्त्यांनी तोंड गोड करून,फटाके फोडून प्रहार जनशक्ती पक्षाचा विजय असो या कडकडीत आवाजाने प्रहारचा वर्धापन दिन आनंद उत्सवात साजरा केला.

यावेळी उपजिल्हा प्रमुख अजय टप, तालुका प्रमुख अजित फुंदे,शहर प्रमुख शालीकराम पाटील,उपप्रमुख बळीराम बावस्कार,पत्रकार श्रीकृष्ण भगत, प्राध्यापक संजय पाटील सर,अमोल पाटील,अर्जुन पाटील,शिवाजी भगत,प्रहार अपंग क्रांती आंदोलनचे तालुका प्रमुख राहुल तायडे, डवले ताई तसेच प्रहारचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. माननीय माजी राज्यमंत्री तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष पक्ष प्रमुख श्री.बच्चू भाऊ कडू ह्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक जनसामान्यांची प्रश्ने मार्गी लावून आपल्या पक्षातील सहकारी मंडळी आणि कार्यकर्ते ह्यांना अधिकाधिक समाजकारण आणि जनतेच्या सुख दुःखात सहभागी राहून काम करण्याची अविरत प्रेरणा देत असून प्रहार जनशक्ती पक्षाची भूमिका अधिकाधिक समाजकारण आणि गोर गरीब जनतेचा बुलंद आवाज प्रखर पणे उभाराहील ह्याची अविरत प्रयत्ने कार्यकर्ते पदाधिकारी करत राहणार ह्याची माहिती देऊन कार्यक्रम सांगता झाली. बयूरो रिपोर्ट भारत लाईव्ह न्यूज मीडिया !

Related Articles

Leave a Reply

Back to top button
DMCA.com Protection Status