प्रो लीग हॉकी : बेल्जियकडून भारताचा पराभव

प्रो लीग हॉकी : बेल्जियकडून भारताचा पराभव

सत्राच्या शेवटच्या काही मिनिटांत भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. पण, भारताला संधीचा फायदा घेता आला नाही

अँटवर्प : सर्वच विभागात निराशाजनक कामगिरी करणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाला रविवारी ‘एफआयएच’ प्रो लीग हॉकीच्या सामन्यात यजमान बेल्जियमकडून ०-५ अशा पराभवाला सामोरे जावे लागले. हा भारताचा सलग दुसरा पराभव ठरला.

या सामन्याच्या सुरुवातीपासूनच बेल्जियमच्या आघाडीपटूंनी भारतीय बचावफळीवर दडपण टाकले. बार्बरा नेलेनने पहिल्याच मिनिटाला गोल करत  बेल्जियमला आघाडी मिळवून दिली. यानंतर तिसऱ्या मिनिटाला एंग्लेबर्ट शार्लोटने गोल करत संघाची आघाडी दुप्पट केली. पहिल्या सत्रापर्यंत बेल्जियमने आपली आघाडी कायम ठेवली.

दुसऱ्या सत्राला भारताची गोलरक्षक बिछू देवीने बेल्जियमचे काही प्रयत्न हाणून पाडले. यादरम्यान राये अबीने (१८वे मि.) गोल करत बेल्जियमची आघाडी ३-० अशी वाढवली. सामन्याच्या २२व्या मिनिटाला बेल्जियमला पेनल्टी कॉर्नर मिळाला. या संधीचा फायदा घेत वांडेन बोरे स्टेफनीने गोल करत संघाला ४-० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली.

सत्राच्या शेवटच्या काही मिनिटांत भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. पण, भारताला संधीचा फायदा घेता आला नाही. तिसऱ्या सत्रात भारतीय संघाने गोल करण्याचे प्रयत्न केले, पण बेल्जियमच्या बचाव फळीने त्यांचे सर्व प्रयत्न हाणून पाडले. बॅलेनग्हीन आंब्रेने (३५वे मि.) आणखी एका गोलची भर घातल्याने बेल्जियमने हा सामना ५-० अशा फरकाने जिंकला.

Go to Source

Related Articles

Back to top button
DMCA.com Protection Status