मृत्यू ची परवानगी मागणार शेतकरी कुटुंब : महाराष्ट्र शासन जबाबदारी घेईल का ? एक्स्ल्युजिव स्टोरी : भारत लाईव्ह न्यूज मीडिया !


जळगाव : धनवीरसिंग ठाकूर , जिल्ह्यातील जामनेर तालुक्या लागत नेरी गावातील हि व्यथा आहे. गेल्या २ वर्षां पासून एक शेतकरी कुटुंब आम्हाला कुणी न्याय देईल ह्या प्रतीक्षेत आहे. परंतु हाताला निराशे खेरीज काहीच लागत नसल्यामुळे आता पर्यंत तीन वेळा आत्मदहन करण्याचा प्रयत्न ह्या दाम्पत्यांनी केला. एवढे असूनही राज्यभर चर्चा हि झाली परंतु शेवटी परत पुन्हा निराशाच हाती लागली असतांना आमच्या जवळ त्यांनी संपूर्ण कुटुंब आत्महत्या करण्याची तैयारी दाखवून ह्या शासन मार्फत आणि पोलीस यंत्रणेच्या भ्र्ष्ट कारभाराने त्यांचे उभ्या आयुष्यावर किती मोठे परिणाम झाले ते मांडले. सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे ,
जामनेर तालुक्यातील नेरी गावात वास्तव्यास असलेले गुज्जर कुटुंब कर्ता सुनील गुज्जर ह्यांनी आपल्या सहकारी शेतकरी गटाचे एकूण शेतकी उत्पन्न मका आणि ईतर धान्य जामनेर येथील पाचोरा रस्त्यावरील महावीर ऍग्रो खाजगी मार्केट येथे ठेवला होता. दरम्यान जागतिक कोरोना महामारी सुरु झाली आणि आपल्या देशात तसेच राज्यात कडक लोकडाऊन लागले. ज्यामुळे जण सामान्य एक ठिकाणाहून दुसरी कडे जाण्यास कुठलाच पर्याय नव्हता आणि ह्याचाच गैर लाभ खाजगी मार्केट संचालक मालक ह्यांनी घेत तो शेतकरी माल सामान ईतरत्र परस्पर रित्या विक्री करून शेतकऱ्यांना अंधारात ठेवले.
आपला माल सुरक्षित रित्या जामनेर येथील महावीर मार्केट येथे असल्याची शाश्वती बाळगून शेतकऱ्याने उचल रक्कम हि घेतली होती. दरम्यान कोरोना निर्बंध शिथिल झाले आणि शेतकरी आपल्या मालाची विक्री करण्यासाठी प्रयत्ने करू लागले. जामनेर येथील महावीर ऍग्रो मार्केट येथे गेले असता. तेथील कर्मचारी आणि मालक संचालक ह्यांनी आपण कुठलाच माल आणला नसून. जो काही माल आधी पोहोचलाही असेल त्याचे पैसे आधीच देण्यात आलेले आहेत. अशी उत्तरे मिळाली , ते समजून ऐकून शेतकरी ह्यांचे संवेदना हरपून त्यांना आपल्या सोबत कोट्यावधी रुपयांची आर्थिक जबरी फसवेगिरी झाल्याचा धसका बसला.
शेतकरी तेथून पोलीस स्थानकात जाऊन कम्प्लेंट देण्यासाठी गेले असता त्यांना ताटकळत ठेवण्यात आले. पोलीस दलाच्या भ्रष्ट कर्मचारी अधिकाऱ्यांनी व्यापारीची सांगड घालून कम्प्लेंट रजिस्टर करण्यास हरकत दाखवली. तसेच अवाजवी तपास पुढे पाठवून शेतकरीच खोटे बोलत सोंग करत असल्याचा दावा केला.
शेतकरी कुटुंबाने हतबल होऊन पुढील वरिष्ठ पोलीस अधिकारी ह्यांचेशी विनवणी केले असता पुन्हा निराशा हाती आली. आपली बाजू आणि झालेला पूर्ण प्रकार कुणीही ऐकून घेत नसल्यामुळे त्यांना नाईलाजाने जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे उपोषण करावे लागले. रोज उपोषणाच्या ठिकाण समोरून शेकडो पोलीस अधिकारी प्रशासकीय कर्मचारी अधिकारी जात पसार होत होते. परंतु कुणीही ह्या पीडित दाम्पत्याची दाखल घेण्यास पुढे सरसावत नव्हते. बघता बघता महिना पूर्ण झाला त्यावरही अधिक दिवस होऊ लागले. परंतु कुठलीच योग्य दाखल घेतल्या जात नसल्यामुळे हतबल शेतकरी दाम्पत्य आपली हिम्मत खचून जात आपल्याला दाद मिळत नाही . ह्या शासन व्यवस्थेत कुणीही एक शेतकऱ्याची दाखल घेण्यास इच्छुक नसल्याचे दिसत असतांना.
त्यांनी आपण आपल्या जवळ दूसरा मार्ग दिसत नसल्याचे बघत पत्नी ने आत्मदहनाचा प्रथम प्रयत्न जिल्हाधिकारी कार्यालय येथे केला तेथे उपस्थित असलेल्या मंत्री महोदय तसेच इतर पोलिस दलाच्या कर्मचाऱ्यानी तत्काळ त्यांना आपल्या ताब्यात घेवून जिल्हयापेठ पोलिस स्टेशन जळगाव येथे नेण्यात आले. तेथे त्यांचे सोबत अमानुषी वागणूक करीत अनेक तास त्यांना ज्वलनशील द्रव्य अंगावर ओतलेल्या अवस्थेत बसवून ठेवण्यात आले. ज्यामुळे त्यांना शारीरिक इजा झालीच त्यासोबत तेथीलच कर्तव्यवर हजर असलेल्या पोलिस कर्मचारी ह्यांनी उलट जबाब आणि आक्षेपार्ह शब्दांत “ जाळून मारायचा शोख असेल तर आम्हीच काडी लावून पेटवतो “ सारखे वर्तन करून अधिक उतपीडण करण्यात आले.
आधीच आर्थिक ग्रस्त आणि शासन न्याय दाद देत नसल्यामुळे ग्रस्त दाम्पत्याला आपले चुकले तरी काय ? आपण न्यायाची अपेक्षा का करावी ? सारखे प्रश्न मानसिक तनाव निर्माण करीत होते.
सोबत इतर शेतकरी ज्यांचे धान्य गुज्जर ह्यांचे विश्वासवर महावीर एग्रो मार्केट येथे होते ते ही आपल्या रकमेसाठी तगादा लावीत होते. दाम्पत्य अधिकच अडचणीत सापडून गेल्यामुळे सुनील गुज्जर ह्यांनी मुंबई येथे ही मुख्यमंत्री ह्यांचे समोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. तरी देखील नाममात्र कार्यवाही होऊन उलट सुनील गुज्जर ह्यांचेवर पॉलिसी कार्यवाही करून पुनः त्यांना माघारी पाठवून देण्यात आले.
पुनः पुनः मिळत असलेल्या निराशेटून त्यांनी जळगाव न्यायालयात 156 प्रकरण दाखल करण्याची प्रयत्न सुरू केले परंतु समोरील व्यापारी ह्यांनी त्यांच्या आर्थिक बळाचा गैर वापर करून त्यांना तेथेही मात दिली. पूर्ण पणे खचून गेलेल्या ह्या कुटुंबाने शेवटी आमच्याशी संपर्क करून आपल्या सोबत घडलेला प्रकार आणि त्या समोर प्रशासन तसेच पोलिस विभाग आणि त्यांच्या कामातील आर्थिक तडजोडीतून होत असलेला गैर प्रकार मांडला. महाराष्ट्र सामाजिक न्याय विभाग तसेच आर्थिक गुन्हे आणि गुन्हे अन्वेषण ह्यांच्या वतीने सादर घटनेची त्वरित दाखल घेवून कार्यवाही करणे अपेक्षित वरील प्रकरणाची सखोल आणि पारदर्शक चौकशी तसेच तपासाचे माफक मागणी सदर शेतकरी दाम्पत्य कुटुंब करीत आहे. तसेच न्याय मिळत नसल्यास किमान शासनाने आम्हाला सह कुटुंब मृत्यू ची परवानगी देवून जबाबदारी स्वीकारावी असा प्रश्न ही उपस्थित केला आहे. सदर घटनेची जाण घेवून महाराष्ट्र शासन व्यवस्था काय कार्यवाही करतील ह्या कडे सर्व सामान्य जनतेसह पुढील होणाऱ्या सर्व कार्यवाही कडे प्रसार माध्यमांचे लक्ष लागून. ब्यूरो रिपोर्ट भारत लाईव्ह न्यूज मीडिया !